28.7 C
Mumbai
Saturday, October 31, 2026
घरबिजनेसबँक ऑफ बडोदाची दुसऱ्या तिमाहीत नफा ३५.८ टक्क्यांनी वाढला

बँक ऑफ बडोदाची दुसऱ्या तिमाहीत नफा ३५.८ टक्क्यांनी वाढला

६,५३२ कोटींची कमाई

Google News Follow

सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ बडोदाने चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत दमदार आर्थिक कामगिरी करत नफ्याचा नवा विक्रम नोंदवला आहे. जुलै ते सप्टेंबर २०२६ या तिमाहीत बँकेचा निव्वळ नफा वार्षिक तुलनेत ३५.८ टक्क्यांनी वाढून ६,५३२ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. बँकेच्या इतिहासातील हा आतापर्यंतचा सर्वाधिक तिमाही नफा ठरला आहे. विशेष म्हणजे, पहिल्यांदाच बँकेचा तिमाही नफा ६,५०० कोटी रुपयांच्या पुढे गेला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत बँकेने ४,८०९ कोटी रुपयांचा नफा नोंदवला होता.

बँकेच्या नफ्यातील या वाढीमध्ये व्याज उत्पन्न आणि बिगर व्याज उत्पन्नाचा महत्त्वाचा वाटा आहे. बँकेचे निव्वळ व्याज उत्पन्न ९ टक्क्यांनी वाढून १३,०२६ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. तर बिगर व्याज उत्पन्नात तब्बल ९६ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली असून ते ६,८८१ कोटी रुपयांवर गेले आहे. विशेषतः गुंतवणूक आणि ट्रेझरी व्यवहारातून मिळालेल्या उत्पन्नामुळे बँकेच्या कमाईला मोठी चालना मिळाली. बँकेचे ट्रेझरी उत्पन्न १,०८६ कोटी रुपयांवरून वाढून ४,०९३ कोटी रुपयांवर पोहोचले आहे.
हे ही वाचा:
सहा महिन्यांतच वित्तीय तूट ७.१४ लाख कोटींवर

पोलंडमधील राजकीय संघर्षामुळे राष्ट्राध्यक्षांना परतावे लागले मायदेशी

सणासुदीच्या काळात खाद्यतेलाच्या दराचा भडका

अमेरिकन शेअर बाजारात ‘ब्लॅक फ्रायडे’!

बँकेच्या व्यवसायविस्तारातही सकारात्मक चित्र दिसून आले आहे. सप्टेंबर २०२६ अखेर देशांतर्गत कर्जवाटपात १३.५ टक्क्यांची वाढ होऊन ते ११.८७ लाख कोटी रुपयांवर पोहोचले. जागतिक कर्जवाटप १८.३ टक्क्यांनी वाढून १५.१२ लाख कोटी रुपये झाले आहे. देशांतर्गत ठेवींमध्ये १६.६ टक्क्यांची वाढ होऊन त्या १४.८३ लाख कोटी रुपयांवर, तर जागतिक ठेवी १७.४५ लाख कोटी रुपयांवर पोहोचल्या आहेत.

दरम्यान, बँकेच्या कर्जाच्या गुणवत्तेतही सुधारणा झाली आहे. एकूण अनुत्पादित कर्जांचे प्रमाण २.१६ टक्क्यांवरून घसरून १.७८ टक्क्यांवर आले आहे. तर निव्वळ अनुत्पादित कर्जांचे प्रमाण ०.५७ टक्क्यांवरून ०.३७ टक्क्यांपर्यंत खाली आले आहे. मात्र, निव्वळ व्याज मार्जिनमध्ये किंचित घट झाली आहे. विक्रमी नफा, कर्जवाटपातील वाढ आणि अनुत्पादित कर्जांचे घटते प्रमाण यामुळे बँक ऑफ बडोदाची आर्थिक स्थिती अधिक मजबूत झाल्याचे या निकालातून स्पष्ट झाले आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
340,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा