29.1 C
Mumbai
Saturday, October 31, 2026
घरविशेषमानहानी प्रकरणात ध्रुव राठीच्या अडचणी वाढल्या

मानहानी प्रकरणात ध्रुव राठीच्या अडचणी वाढल्या

दिल्ली न्यायालयाकडून पुन्हा जामीनपात्र वॉरंट

Google News Follow

यूट्यूबर ध्रुव राठी याच्या अडचणीत वाढ झाली आहे. तब्बल आठ वर्षांपासून सुरू असलेल्या मानहानीच्या प्रकरणात दिल्लीतील न्यायालयाने त्याच्याविरोधात पुन्हा जामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. विकास संकृत्यायन ऊर्फ विकास पांडे यांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने हा आदेश दिला. ध्रुव राठीने २०१८ मध्ये आपल्या यूट्यूब चॅनेलवर प्रसिद्ध केलेल्या एका व्हिडिओतून आपली बदनामी केल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. या व्हिडिओमुळे आपली सामाजिक प्रतिष्ठा आणि प्रतिमेला धक्का पोहोचल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात मे २०१८ मध्ये झाली. त्यावेळी ध्रुव राठीने ‘बीजेपी आयटी सेल पार्ट २’ या शीर्षकाचा व्हिडिओ प्रसिद्ध केला होता. भाजपच्या आयटी सेलशी संबंधित काही लोकांनी आपल्याविरोधात बदनामीकारक मोहीम राबवण्यासाठी पैसे देण्याचा प्रयत्न केल्याचा दावा त्याने या व्हिडिओत केला होता. मात्र, हे आरोप निराधार आणि बदनामीकारक असल्याचे सांगत विकास पांडे यांनी न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर न्यायालयीन प्रक्रिया सुरू झाली. जुलै २०१९ मध्ये ध्रुव राठीला समन्सही बजावण्यात आले होते. मात्र, त्याच्या उपस्थितीबाबत निर्माण झालेल्या अडचणींमुळे प्रकरणाची सुनावणी रखडली.
हे ही वाचा:
वनडे संघात जडेजाचे पुनरागमन कठीण

आंध्र प्रदेशातील शाळेत विद्यार्थिनीवर चेनसॉने हल्ला

शिवमंदिराच्या जागेवर उभारलेला पेरियार यांचा पुतळा हटवण्याचे आदेश!

तुरुंगात असलेले मंत्री संजीव अरोरा निवडणूक लढणार

दरम्यान, न्यायालयाने यापूर्वीही ध्रुव राठीविरोधात जामीनपात्र वॉरंट जारी केले होते. मात्र, समन्स बजावण्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्यांना त्याचे गुरुग्राम येथील निवासस्थान बंद असल्याचे आढळले. तक्रारदाराच्या वकिलांनी न्यायालयात असा दावा केला की, ध्रुव राठी सामान्यतः ऑस्ट्रियामध्ये वास्तव्यास असतो. त्यामुळे त्याला न्यायालयासमोर हजर करण्याच्या प्रक्रियेत अडथळे येत आहेत. आता न्यायालयाने पुन्हा जामीनपात्र वॉरंट जारी केल्याने या प्रकरणाला महत्त्व प्राप्त झाले आहे. सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स असलेल्या ध्रुव राठीला आता न्यायालयीन प्रक्रियेला सामोरे जावे लागणार असून, या मानहानी प्रकरणात पुढे काय घडते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
340,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा