30.3 C
Mumbai
Tuesday, November 3, 2026
घरबिजनेसअमेरिका-इराण संघर्षाचा तेल बाजाराला फटका

अमेरिका-इराण संघर्षाचा तेल बाजाराला फटका

कच्च्या तेलाच्या दरात पुन्हा मोठी उसळी

Google News Follow

अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्षामुळे जागतिक तेल बाजारात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. अमेरिकेने इराणच्या केश्म बेटावर हल्ला केल्याच्या वृत्तानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींनी पुन्हा उसळी घेतली आहे. सोमवारी मोठी घसरण नोंदवणाऱ्या तेलाच्या दरांमध्ये मंगळवारी वाढ झाली. अमेरिका-इराण संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीतील तेल वाहतुकीवर निर्माण झालेला धोका यामुळे गुंतवणूकदार आणि तेल व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

मंगळवारी दुपारी साडेबारा वाजेपर्यंत ब्रेंट क्रूडच्या किमतीत १.५७ टक्क्यांची वाढ होऊन तो १०६.४५ डॉलर प्रति बॅरलवर पोहोचला. तर अमेरिकेतील डब्ल्यूटीआय क्रूडचा दर १.६६ टक्क्यांनी वाढून ९८.०६ डॉलर प्रति बॅरल झाला. विशेष म्हणजे, सोमवारी ब्रेंट क्रूडच्या दरात ७.६३ टक्क्यांची मोठी घसरण झाली होती. मात्र, केश्म बेटावरील हल्ल्याच्या वृत्ताने बाजारातील चित्र बदलले. ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ने अमेरिकी अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, होर्मुझच्या सामुद्रधुनीत व्यापारी जहाजांवर इराणकडून होणारे संभाव्य हल्ले रोखण्यासाठी ही कारवाई करण्यात आली.
हे ही वाचा:
भारताचा मॅन्युफॅक्चरिंग पीएमआय ५४.७ अंकांवर

बांगलादेश सीमेवर तस्करांनी जवानांवर केला लाठ्यांनी हल्ला

नाहूरमध्ये लग्नसमारंभातील जेवणातून विषबाधेचा संशय

मंदिरांत पुजारी बलात्कार करतात…नेहा बोराने विष ओकले

होर्मुझची सामुद्रधुनी हा जागतिक ऊर्जा व्यापारातील अत्यंत महत्त्वाचा सागरी मार्ग आहे. युद्धापूर्वी जगातील कच्च्या तेलाच्या आणि नैसर्गिक वायूच्या एकूण पुरवठ्यापैकी जवळपास २० टक्के पुरवठा याच मार्गाने होत होता. मात्र, अमेरिका-इराण संघर्षामुळे या मार्गावरील जहाजांची वाहतूक मोठ्या प्रमाणात घटली आहे. त्यामुळे तेल पुरवठा दीर्घकाळ विस्कळीत होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याचा सर्वाधिक परिणाम भारतासारख्या तेल आयातदार देशांवर होऊ शकतो. कच्च्या तेलाचे दर वाढल्यास इंधन महागाई आणि वाहतूक खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, युद्ध थांबवण्यासाठी दोन्ही देशांमध्ये राजनैतिक पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. कतारच्या मध्यस्थीने झालेल्या चर्चेत काही प्रस्तावांमध्ये बदल करण्यात आले, मात्र अद्याप ठोस तोडगा निघालेला नाही. इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी शांतता चर्चेसाठी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांनी सरकारला काही अधिकार दिल्याचे सांगितले आहे. दुसरीकडे, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही इराणसोबत करार होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे आता युद्धविरामाच्या प्रयत्नांना यश मिळते की संघर्ष आणखी चिघळतो, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा