30.6 C
Mumbai
Tuesday, November 10, 2026
घरक्राईमनामामंदिर परिसरात मांसाचे अवशेष टाकण्यावरून वाद; पुजाऱ्यासह ग्रामस्थांना मारहाण

मंदिर परिसरात मांसाचे अवशेष टाकण्यावरून वाद; पुजाऱ्यासह ग्रामस्थांना मारहाण

इरफानसह सहा जणांना अटक

Google News Follow

उत्तर प्रदेशातील रायबरेली जिल्ह्यात मंदिर परिसरात मांसाचे अवशेष आणि घरातील कचरा टाकण्यास विरोध केल्याने मंदिराच्या पुजाऱ्यासह काही ग्रामस्थांवर हल्ला करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. नसीराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आलमपूर गावातील भुइयारानी मंदिराजवळ ६ नोव्हेंबर रोजी हा प्रकार घडला. या हल्ल्यात पुजारी कमलेश दास यांच्यासह अनेक जण जखमी झाले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी सरवर उर्फ इरफान याच्यासह सहा जणांना अटक केली असून त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे.

माहितीनुसार, मंदिर परिसरात जनावरे चारण्यास तसेच तेथे मांस, कोंबडीचे अवशेष, बकऱ्यांचे अवशेष आणि घरातील कचरा टाकण्यास पुजारी कमलेश दास यांनी विरोध केला होता. यावरून दोन गटांमध्ये वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. आरोपींनी पुजाऱ्यावर लाठी-काठ्या आणि धारदार शस्त्राने हल्ला केल्याचा आरोप आहे. पुजाऱ्याच्या मदतीला धावलेल्या शारदा बक्ष सिंह आणि अन्य ग्रामस्थांनाही मारहाण करण्यात आल्याचे वृत्त आहे.

या घटनेत दोन्ही बाजूंचे मिळून ११ जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. त्यामध्ये चार महिलांचाही समावेश आहे. घटनेनंतर शारदा बक्ष सिंह यांच्या तक्रारीवरून नसीराबाद पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलीस अधीक्षक रवी कुमार यांच्या निर्देशानुसार आरोपींचा शोध सुरू करण्यात आला. ८ नोव्हेंबर रोजी गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी हनुमान मंदिर चौकाजवळून सहा जणांना ताब्यात घेतले. सरवर उर्फ इरफान, रिहान, असलम, महफूज, रहीस आणि अल्ताफ अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. हे सर्व जण आलमपूर परिसरातील रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले.

हे ही वाचा:

काळबादेवीत भररस्त्यावर रॉकेट फोडणाऱ्या तरुणावर गुन्हा

यमुनेत आता जलसफर; ‘नमो यमुना रिव्हर सफारी’ आजपासून सुरू

ट्रम्प म्हणतात संघर्ष संपला; इराण म्हणतो शरण या!

मोदी-झेलेन्स्की यांच्यात शांततेच्या प्रयत्नांवर चर्चा

पोलिसांनी आरोपींकडून एक धारदार शस्त्र (बांका) आणि चार बांबूच्या काठ्या जप्त केल्या आहेत. तपासादरम्यान भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१) चा समावेशही गुन्ह्यात करण्यात आला आहे. हे कलम धोकादायक शस्त्रांचा वापर करून दुखापत किंवा गंभीर दुखापत केल्याशी संबंधित आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा