28.1 C
Mumbai
Tuesday, November 10, 2026
घरक्राईमनामाकाळबादेवीत भररस्त्यावर रॉकेट फोडणाऱ्या तरुणावर गुन्हा

काळबादेवीत भररस्त्यावर रॉकेट फोडणाऱ्या तरुणावर गुन्हा

अवघ्या पाच मिनिटांत तीन रॉकेट हवेत सोडली

Google News Follow

मुंबईतील काळबादेवी परिसरात भररस्त्यावर फटाक्यांची रॉकेट उडवून वाहनचालक आणि पादचाऱ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या ३४ वर्षीय तरुणाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दिवाळीच्या रात्री या तरुणाने अवघ्या पाच मिनिटांत तीन रॉकेट उडवली. यापैकी दोन रॉकेट रस्त्यावरून जाणाऱ्या कार आणि दुचाकींना लागली, तर तिसरे रॉकेट जवळच्या इमारतीच्या भिंतीवर आदळले. या घटनेनंतर आझाद मैदान पोलिसांनी संबंधित तरुणाविरोधात कारवाई केली आहे.

अविनाश उमेश साहा (३४) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो चालक असून काळबादेवी पोस्ट ऑफिसजवळील बोमनजी मास्टर लेन परिसरात एका दुकानात राहतो. मूळचा बिहारमधील मुझफ्फरपूर येथील रहिवासी असलेला साहा याच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ८ नोव्हेंबर रोजी रात्री ८ ते ९ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत पोलिस हवालदार वाघमारे यांची धोबीतलाव परिसरात नाईट ड्युटीसाठी नियुक्ती करण्यात आली होती. गस्तीवर जाण्यापूर्वी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पोलिस कर्मचाऱ्यांना मुंबई उच्च न्यायालयाचे आणि मुंबई पोलिस आयुक्तांचे फटाके फोडण्यासंदर्भातील निर्बंध समजावून सांगितले होते. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या होत्या.

९ नोव्हेंबर रोजी पहाटे १.२५ ते १.३० च्या दरम्यान सहाय्यक पोलिस निरीक्षक चेमटे आणि हवालदार वाघमारे गस्तीवर असताना अल्फ्रेड जंक्शनजवळ बोमनजी मास्टर लेन परिसरात रस्त्यावर दोन रॉकेट उडवली जात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. ही रॉकेट रस्त्यावरून जाणाऱ्या कार आणि दुचाकींना लागली. त्यानंतर सहाय्यक पोलिस निरीक्षकांनी वाघमारे आणि पोलिस शिपाई परित यांना घटनास्थळी जाण्याचे निर्देश दिले.

पोलिस घटनास्थळी पोहोचले असता अविनाश साहा याच्या हातात आणखी एक रॉकेट असल्याचे दिसले. तो रॉकेटची वात पेटवत असतानाच पोलिसांनी त्याला पाहिले. मात्र, पोलिस जवळ पोहोचण्यापूर्वीच रॉकेट उडाले. हवेत गेल्यानंतर ते जवळच्या रस्त्याच्या दिशेने जाऊन एका इमारतीच्या भिंतीवर आदळले. चौकशीदरम्यान त्याने आपले नाव अविनाश उमेश साहा असल्याचे सांगितले.

हे ही वाचा:

यमुनेत आता जलसफर; ‘नमो यमुना रिव्हर सफारी’ आजपासून सुरू

ट्रम्प म्हणतात संघर्ष संपला; इराण म्हणतो शरण या!

मोदी-झेलेन्स्की यांच्यात शांततेच्या प्रयत्नांवर चर्चा

‘गोकुळ’ची निवडणूक होणार… स्थगितीची मागणी फेटाळली

न्यायालय आणि पोलिसांच्या आदेशांचे उल्लंघन

सार्वजनिक रस्त्यावर अशा प्रकारे रॉकेट उडवून वाहनचालक आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण केल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने २२ सप्टेंबर २०२६ रोजी दिलेले निर्देश आणि मुंबई पोलिस आयुक्तांनी ५ ऑक्टोबर रोजी जारी केलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी साहाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास आझाद मैदान पोलिस करत आहेत.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा