28.1 C
Mumbai
Tuesday, November 10, 2026
घरदेश दुनियामोदी-झेलेन्स्की यांच्यात शांततेच्या प्रयत्नांवर चर्चा

मोदी-झेलेन्स्की यांच्यात शांततेच्या प्रयत्नांवर चर्चा

संवाद, राजनैतिक मार्गावर भारताचा भर

Google News Follow

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी (९ नोव्हेंबर) युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोदिमीर झेलेन्स्की यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये रशिया-युक्रेन युद्धातील ताज्या घडामोडी, शांतता प्रस्थापित करण्याचे प्रयत्न आणि भारत-युक्रेनमधील द्विपक्षीय संबंधांवर चर्चा झाली. युद्धाचा प्रश्न संवाद आणि राजनैतिक मार्गाने सोडवला गेला पाहिजे, ही भारताची भूमिका पंतप्रधान मोदी यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केली. तसेच युद्धाच्या शांततापूर्ण तोडग्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांमध्ये योगदान देण्याची भारताची तयारी असल्याचेही त्यांनी सांगितले.

पंतप्रधान मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर या संवादाची माहिती दिली. झेलेन्स्की यांनी युद्धातील सद्यस्थिती, त्याचे मानवी परिणाम आणि शांततेसाठी सुरू असलेल्या विविध प्रयत्नांबाबत आपले विचार मांडल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. दोन्ही देशांमधील विविध क्षेत्रांतील सहकार्याचा आढावा घेण्यात आला असून भारत-युक्रेन संबंध अधिक मजबूत करण्यावरही दोन्ही नेत्यांचे एकमत झाले.

या चर्चेनंतर झेलेन्स्की यांनीही ‘एक्स’वर प्रतिक्रिया दिली. त्यांनी पंतप्रधान मोदी यांना युद्धातील ताज्या राजनैतिक घडामोडींची माहिती दिल्याचे सांगितले. अबुधाबी येथे होणाऱ्या आगामी शांतता चर्चेच्या तयारीला युक्रेनने सुरुवात केली असून चर्चेच्या अजेंड्यावरील प्रत्येक मुद्द्यावर काम सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. युक्रेनने शांततेसाठी रचनात्मक भूमिका घेतली आहे, आता रशियानेही तणाव कमी करण्यासाठी तशीच तयारी दाखवावी, असे आवाहन त्यांनी केले.

हे ही वाचा:

‘गोकुळ’ची निवडणूक होणार… स्थगितीची मागणी फेटाळली

डॉलरच्या तुलनेत रुपया २५ पैशांनी वधारला

अटल सेतू – मुंबई पुणे एक्स्प्रेवेला जोडणाऱ्या उन्नत मार्गाचे ६७ टक्के पूर्ण

वेस्ट इंडिजचा मालिकाविजय!

युद्ध संपवण्याची वेळ आली असून ते आणखी सुरू ठेवण्याची गरज नाही, ही भूमिका मोदी यांनी यापूर्वीही रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यासमोर मांडल्याचे झेलेन्स्की यांनी नमूद केले. युद्ध संपवण्यासाठी भारत इतर जागतिक नेत्यांशी कोणत्या पातळीवर संवाद साधू शकतो, याबाबतही त्यांनी अपेक्षा व्यक्त केली.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा