33 C
Mumbai
Friday, November 13, 2026
घरस्पोर्ट्सहेन्रीच्या भेदक माऱ्याने भारताचा धुव्वा

हेन्रीच्या भेदक माऱ्याने भारताचा धुव्वा

Google News Follow

न्यूझीलंडने चौथ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाचा तब्बल २४४ धावांनी धुव्वा उडवला. यजमान न्यूझीलंडने दिलेल्या ३३४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजीचा अक्षरशः पत्त्यांचा बंगला कोसळला. संपूर्ण भारतीय संघ अवघ्या २६.४ षटकांत ८९ धावांवर गारद झाला. न्यूझीलंडच्या विजयाचा शिल्पकार ठरला तो वेगवान गोलंदाज मॅट हेन्री. त्याने अवघ्या २७ धावा देत सहा भारतीय फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला.

भारताच्या डावाची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली. हेन्रीने पहिल्याच षटकात रोहित शर्मा, विराट कोहली आणि कर्णधार श्रेयस अय्यर यांना खातेही उघडू न देता माघारी धाडले. त्यानंतर ऋतुराज गायकवाडही अवघ्या पाच धावा करून बाद झाला. अवघ्या नऊ धावांत चार प्रमुख फलंदाज गमावल्याने भारतीय संघ संकटात सापडला.

ईशान किशन आणि अक्षर पटेल यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. ईशानने ५३ चेंडूंत २७ धावा केल्या, तर अक्षरने ३६ चेंडूंत २१ धावांचे योगदान दिले. मात्र, त्यांची झुंज फार काळ टिकली नाही. नमन धीरने २४ चेंडूंत २१ धावा केल्या. उर्वरित फलंदाजांना मोठी खेळी करता आली नाही. न्यूझीलंडकडून मॅट हेन्रीने ९.४ षटकांत २७ धावा देत सहा विकेट्स घेतल्या, तर मॅथ्यू फिशरने तीन फलंदाजांना बाद केले.

तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने ५० षटकांत ३३३ धावा केल्या. विल यंगने १०८ चेंडूंत १२५ धावांची शानदार शतकी खेळी साकारली. टिम सायफर्टने ५८ धावा करत त्याला चांगली साथ दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी ८५ धावांची भागीदारी केली. फिन अ‍ॅलनने ४१ धावा केल्या, तर अखेरच्या टप्प्यात मिचेल सँटनरने २४ आणि ख्रिश्चन क्लार्कने २२ धावांचे योगदान दिले. काइल जेमिसन १९ धावांवर नाबाद राहिला.

भारताकडून आकिब नबी, गुरनूर बरार आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. अर्शदीप सिंग आणि नमन धीर यांनी प्रत्येकी एक विकेट मिळवली. मात्र, गोलंदाजांच्या प्रयत्नांनंतरही भारतीय फलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केल्याने न्यूझीलंडने मोठा विजय साकारला.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
342,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा