35 C
Mumbai
Friday, November 13, 2026
घरस्पोर्ट्सआठ वर्षांनंतर सँडपेपरचे भूत पुन्हा बाटलीबाहेर!

आठ वर्षांनंतर सँडपेपरचे भूत पुन्हा बाटलीबाहेर!

Google News Follow

२०१८ मधील गाजलेल्या ‘सँडपेपर’ प्रकरणावरून ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये पुन्हा खळबळ उडाली आहे. उस्मान ख्वाजाने आपल्या ‘सब्र’ या पुस्तकातून संपूर्ण ऑस्ट्रेलियन संघाला चेंडूशी छेडछाड केल्याची माहिती होती, असा दावा केला. मात्र, ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने हे आरोप फेटाळून लावत ख्वाजावर जोरदार पलटवार केला आहे.

‘संपूर्ण संघाला सँडपेपर मैदानात नेल्याची माहिती होती, असे म्हणणे १०० टक्के चुकीचे आहे. हा दावा पूर्णपणे बकवास आहे,’ अशा शब्दांत कमिन्सने आपली नाराजी व्यक्त केली. सिडनी येथे घेतलेल्या तब्बल ६८ मिनिटांच्या पत्रकार परिषदेत त्याने ख्वाजाच्या आरोपांचे खंडन केले.

ख्वाजाने आपल्या पुस्तकात कमिन्ससह अन्य खेळाडू या प्रकरणातील कटाचे सूत्रधार असल्याचा आरोप केल्याचे कमिन्सने सांगितले. विशेष म्हणजे, सँडपेपर वापरताना सावध राहण्याचा सल्ला ख्वाजानेच कॅमेरून बॅनक्रॉफ्टला दिल्याचे समोर आल्याने आपल्याला मोठा धक्का बसल्याचेही त्याने नमूद केले.

‘ख्वाजा माझा मित्र आहे; मात्र मित्रांनी एकमेकांच्या आयुष्याशी आणि प्रतिष्ठेशी इतक्या बेफिकिरीने वागू नये,’ अशी खंत कमिन्सने व्यक्त केली. या प्रकरणामागे कोणताही पूर्वनियोजित कट नव्हता, संघाची बैठक झाली नव्हती किंवा कोणत्याही गोलंदाजाने चेंडूशी छेडछाड करण्यास सांगितले नव्हते, असेही त्याने स्पष्ट केले.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
342,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा