35 C
Mumbai
Friday, November 13, 2026
घरविशेषआसाममधील काझीरंगाजवळ ट्रक-मिनी बसच्या धडकेत २३ ठार

आसाममधील काझीरंगाजवळ ट्रक-मिनी बसच्या धडकेत २३ ठार

मिनी बसमध्ये बहुतांश विद्यार्थी असल्याचा अंदाज

Google News Follow

आसाममधील काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाजवळ ट्रक आणि मिनी बसची समोरासमोर भीषण धडक होऊन किमान २३ जणांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी (१३ नोव्हेंबर) झालेल्या या अपघातात अनेक जण जखमी झाले असून, मिनी बसमधील बहुतांश प्रवासी विद्यार्थी असल्याची माहिती समोर आली आहे. अपघातानंतर घटनास्थळी बचावकार्य सुरू असून, मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

माहितीनुसार, मिनी बस बोकाखात येथून नागावच्या दिशेने जात होती. त्यावेळी काझीरंगा परिसरातील रोंगाजन येथे कंटेनर ट्रकने मिनी बसला समोरून जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की मिनी बसचा पुढील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला. अनेक प्रवासी वाहनात अडकून पडले. स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. वाहनात अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.

जखमींना उपचारासाठी कोहोरा मॉडेल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गंभीर जखमींपैकी काहींना पुढील उपचारांसाठी जोरहाट मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात हलवण्यात आले आहे. गोलाघाटचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक स्वप्ननील डेका यांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, या अपघातात किमान २३ जणांचा मृत्यू झाल्याची भीती आहे. बचाव पथके वाहनातून मृतदेह बाहेर काढत असून, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. मिनी बसमध्ये नेमके किती प्रवासी होते, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

हे ही वाचा:

पश्चिम बंगाल आवास योजनेतील ‘घुसखोरां’ची सीआयडी चौकशी

नांदेडमध्ये सापडलेल्या पाकिस्तानी ब्युटी क्रीममध्ये विषारी पारा

राहुल गांधींकडे व्होट चोरीनंतर आता फोन टॅपिंगचा मुद्दा

५०० पाकिस्तानी हिंदू शरणार्थी ऐकणार रामकथा

आसामचे पंचायत आणि ग्रामीण विकास मंत्री तसेच स्थानिक आमदार अतुल बोरा यांनी घटनास्थळी धाव घेतली असून, मदत आणि बचावकार्यावर ते लक्ष ठेवून आहेत. माहितीनुसार, मिनी बस वेगाने जात होती आणि राष्ट्रीय उद्यानाजवळ लागू असलेल्या वेगमर्यादेचे उल्लंघन झाले असावे. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रकला धडक बसल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
342,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा