29 C
Mumbai
Saturday, November 14, 2026
घरविशेषडॉ. थंगजाम धाबाली सिंग यांना ओ.एन.ई. इंडिया पुरस्कार

डॉ. थंगजाम धाबाली सिंग यांना ओ.एन.ई. इंडिया पुरस्कार

मणिपूरच्या आरोग्य, पर्यटन क्षेत्रातील योगदानाचा गौरव

Google News Follow

मणिपूरच्या आरोग्य आणि सामाजिक विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल मणिपूरमधील प्रसिद्ध पॅथॉलॉजिस्ट, उद्योजक आणि संस्थास्रष्टे डॉ. थंगजाम धाबाली सिंग यांना प्रतिष्ठित ‘१७ वा ओ.एन.ई. इंडिया पुरस्कार २०२६’ जाहीर झाला आहे. ‘माय होम इंडिया’ या संस्थेच्या वतीने हा पुरस्कार दिला जातो. मणिपूरसह देशाच्या विकासासाठी त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

या पुरस्काराचे वितरण मंगळवार, १७ नोव्हेंबर रोजी मुंबईतील दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात होणार आहे. दुपारी चार वाजल्यापासून सुरू होणाऱ्या या कार्यक्रमाला तमिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र अर्लेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री नितेश राणे सन्माननीय अतिथी असतील, तर पद्मश्री डॉ. शशांक जोशी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. या पुरस्कार सोहळ्याचे संकल्पनाकार ‘माय होम इंडिया’चे संस्थापक सुनील देवधर असून, डॉ. हरीश शेट्टी स्वागताध्यक्ष आणि श्रवण झा संयोजक आहेत.

डॉ. सिंग यांनी मणिपूरमध्ये आरोग्य सुविधांचा विस्तार करण्यासाठी महत्त्वपूर्ण काम केले आहे. संघर्ष आणि अनिश्चिततेच्या काळातही त्यांनी आपली जन्मभूमी सोडण्याऐवजी तेथेच आरोग्यसेवा विकसित करण्यावर भर दिला. ‘बेबिना ग्रुप’च्या माध्यमातून त्यांनी अत्याधुनिक वैद्यकीय तपासणी आणि उपचारांच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या. कर्करोगावरील उपचारांची सोय निर्माण केल्यामुळे स्थानिक रुग्णांना उपचारांसाठी दूरच्या शहरांत जाण्याची गरज कमी झाली.

हे ही वाचा:

पश्चिम बंगाल आवास योजनेतील ‘घुसखोरां’ची सीआयडी चौकशी

नांदेडमध्ये सापडलेल्या पाकिस्तानी ब्युटी क्रीममध्ये विषारी पारा

राहुल गांधींकडे व्होट चोरीनंतर आता फोन टॅपिंगचा मुद्दा

५०० पाकिस्तानी हिंदू शरणार्थी ऐकणार रामकथा

आरोग्य क्षेत्राबरोबरच त्यांनी पर्यटन आणि रोजगारनिर्मितीतही योगदान दिले. मणिपूर पर्यटन मंचाचे संस्थापक अध्यक्ष म्हणून त्यांनी राज्याच्या पर्यटनाला चालना दिली. तसेच ‘इम्फाल पीस म्युझियम’च्या माध्यमातून भारत-जपान संबंधांना उजाळा दिला. या कार्याची दखल घेत जपान सरकारने २०२० मध्ये त्यांना ‘ऑर्डर ऑफ द रायझिंग सन, गोल्ड अँड सिल्व्हर रेज’ हा सन्मान प्रदान केला होता.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
342,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा