31 C
Mumbai
Saturday, November 14, 2026
घरराजकारणविरोधक गेली दहा वर्षे धक्क्यातून सावरलेले नाहीत!

विरोधक गेली दहा वर्षे धक्क्यातून सावरलेले नाहीत!

राहुल गांधींचे भारत समिटमध्ये वक्तव्य

Google News Follow

२०१४मध्ये झालेल्या निवडणुकीत जो धक्का विरोधकांना बसला आहे, त्यातून एक दोन वर्षे नव्हे तर गेली १० वर्षे धक्क्यातून विरोधक सावरलेले नाहीत, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भारत समिट या हैदराबाद येथे आयोजित कार्यक्रमात दुःख व्यक्त केले.

२०१४ मध्येच देशाची लोकशाही व्यवस्था उद्ध्वस्त झाली होती. त्यानंतर देशातील राजकीय आणि निवडणूक प्रक्रियेत मोठे बदल घडत असताना विरोधक जवळपास दशकभर धक्क्यात होते, असे विधान त्यांनी केले. भारत आता लोकशाही राहिलेला नाही, असा आरोप त्यांनी पुन्हा एकदा केला.

हैदराबाद येथे आयोजित भारत समिट २०२६ मध्ये बोलताना राहुल गांधी म्हणाले की, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर भारतीय राजकारणात नेमके काय घडत आहे, हे समजून घेण्यासाठी विरोधकांना सुरुवातीला मोठा संघर्ष करावा लागला. ते म्हणाले, “२०१४ मध्ये आम्ही एका पूर्णपणे वेगळ्या प्रकारची निवडणूक पाहिली. यापूर्वी कधीही न पाहिलेली अशी निवडणूक होती. राजकीय व्यवस्थेत लाखो-कोट्यवधी डॉलरचा पैसा ओतण्यात आला. प्रचाराची पद्धत पूर्णपणे वेगळी होती. अशा प्रकारचे राजकीय नाट्य आम्ही यापूर्वी कधीही पाहिले नव्हते.” जवळच्या लढती आणि आघाडी सरकारांची सवय असलेल्या निवडणूक व्यवस्थेत अचानक मोठे बदल झाले. त्यामुळे विरोधक जवळपास दशकभर धक्क्यात राहिले, असे राहुल गांधी यांनी सांगितले.

हे ही वाचा:

राहुल गांधींचे पूर्वज कोण, गंगाधर की गियासुद्दीन?

तीन वर्षांनंतर पाकिस्तानी मंत्री भारत दौऱ्यावर

टाटा समूहातील अंतर्गत मतभेद पुन्हा चव्हाट्यावर

वैभव सूर्यवंशीचा विश्वविक्रम!

“विरोधक धक्क्यात नव्हते, असे मी म्हटले तर ते खोटे ठरेल. आम्ही धक्क्यात होतो. एक वर्ष किंवा दोन वर्षे नव्हे, तर संपूर्ण दशकभर आम्ही या धक्क्यात होतो,” असे ते म्हणाले.

काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी देशातील विविध राज्यांच्या निवडणूक निकालांचा अभ्यास करून राजकीय बदल समजून घेण्याचा प्रयत्न केल्याचा दावा त्यांनी केला. महाराष्ट्राचे उदाहरण देताना राहुल गांधी यांनी आरोप केला की, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत विरोधकांना जवळपास समान मते मिळाली होती; मात्र दोन्ही निवडणुकांचे निकाल पूर्णपणे वेगळे होते.

दोन्ही निवडणुकांदरम्यानच्या तीन महिन्यांच्या कालावधीत मतदार यादीत ७० लाख नवीन मतदारांची भर पडली आणि या सर्वांनी भाजपला मतदान केले, असा आरोपही राहुल गांधी यांनी केला.

भारत समिटमध्ये सहभागी होण्यासाठी येणार असलेल्या अनेक आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी आणि नेत्यांना भारतात प्रवेश नाकारण्यात आल्याच्या मुद्द्यावरही राहुल गांधी यांनी भाष्य केले. अशा प्रतिनिधींची त्यांनी जाहीरपणे माफी मागितली.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
342,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा