27 C
Mumbai
Sunday, November 15, 2026
घरदेश दुनियाललित मोदी आता अधिकृतपणे ब्रिटिश नागरिक

ललित मोदी आता अधिकृतपणे ब्रिटिश नागरिक

ऑक्सफर्ड युनियनमध्ये भाषणा दरम्यान केली घोषणा

Google News Follow

इंडियन प्रीमियर लीगला (आयपीएल) जागतिक स्तरावर ओळख मिळवून देणारे ललित मोदी आज पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. मात्र, यावेळी चर्चा त्यांच्या क्रिकेटमधील योगदानाची नसून ब्रिटिश नागरिकत्व स्वीकारण्याची आहे. तब्बल १६ वर्षांपूर्वी भारत सोडून ब्रिटनमध्ये वास्तव्यास गेलेल्या ललित मोदी यांनी आता अधिकृतपणे ब्रिटिश नागरिक झाल्याची घोषणा केली आहे. ऑक्सफर्ड युनियनमध्ये भाषण करताना त्यांनी हा आनंदाचा क्षण असल्याचे सांगितले. ब्रिटनला आपले घर संबोधत तेथील संस्था, परंपरा आणि मूल्यांचे गुणगानही गायले.

२००८ मध्ये आयपीएलची सुरुवात करून क्रिकेटला व्यावसायिक मनोरंजनाचे नवे व्यासपीठ देण्याचे श्रेय ललित मोदी यांना दिले जाते. मात्र, या यशस्वी व्यावसायिक प्रयोगामागे आर्थिक व्यवहार, फ्रँचायझींचे वाटप, प्रसारण हक्क आणि प्रशासनातील पारदर्शकतेवरून अनेक वादही निर्माण झाले. २०१० मध्ये आयपीएलच्या अंतिम सामन्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) त्यांना निलंबित केले. त्यानंतर चौकशीअंती २०१३ मध्ये बीसीसीआयने त्यांच्यावर आजीवन बंदी घातली. गैरव्यवहार आणि आर्थिक अनियमिततेच्या आरोपांमुळे त्यांची क्रिकेट प्रशासनातील कारकीर्द वादग्रस्त ठरली.
हे ही वाचा:
दिल्लीचा हवेचा गुणवत्ता निर्देशांक ४०० पार

मुंबईत सीएनजीच्या दरात दिड रूपयांनी वाढ

मेट्रोचा विस्तार मोठा, पण किती होईल नफा-तोटा?

मोदींनी काँग्रेसजनांना असे केले ‘टॅप’ |

विशेष म्हणजे, २०१० मध्ये भारत सोडल्यानंतर ते ब्रिटनमध्ये वास्तव्यास आहेत. अंमलबजावणी संचालनालयाच्या आर्थिक गैरव्यवहार आणि मनी लॉन्डरिंगसंदर्भातील तपासातही त्यांचे नाव आले. २०१५ मध्ये मुंबईतील विशेष न्यायालयाने त्यांच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले होते. भारत सरकारकडून त्यांच्या प्रत्यार्पणासाठीही प्रयत्न करण्यात आले. मात्र, ललित मोदी यांनी आपल्यावरील आरोप फेटाळले आहेत. आता ब्रिटिश नागरिकत्व मिळाल्यानंतर ललित मोदी यांनी नव्या आयुष्याचा अध्याय सुरू झाल्याचे म्हटले आहे. ब्रिटनच्या प्रगतीत योगदान देण्याची इच्छाही व्यक्त केली आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
342,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा