31 C
Mumbai
Monday, November 16, 2026
घरबिजनेसजेन्सेन हुआंगना एनव्हिडियाच्या सीईओपदी विराजमान करण्याची तयारी

जेन्सेन हुआंगना एनव्हिडियाच्या सीईओपदी विराजमान करण्याची तयारी

एनव्हिडियाच्या अनेक कर्मचाऱ्यांकडूनही पुनरागमनाचे समर्थन

Google News Follow

चिनी गुप्तहेर आणि कंपनीतील कर्मचाऱ्यांसोबतच्या कथित प्रेमसंबंधांच्या बातम्यांनंतर एनव्हिडियाच्या सीईओ पदाचा राजीनामा दिलेले जेन्सेन हुआंग आता पुन्हा कंपनीत परतण्याच्या तयारीत आहेत. यासाठी त्यांची आपल्या सहकाऱ्यांशी चर्चा सुरू असल्याची माहिती एका अहवालातून समोर आली आहे.

फायनान्शियल टाइम्सच्या अहवालानुसार, हुआंग एनव्हिडियाच्या सीईओ पदावर पुन्हा विराजमान होण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यासाठी सिलिकॉन व्हॅलीतील प्रभावशाली व्यक्ती आणि गुंतवणूकदार कंपनीच्या संचालक मंडळावर दबाव आणत आहेत.

अहवालात पुढे म्हटले आहे की, सध्या हुआंग आपल्या सहकाऱ्यांशी पुनरागमनाच्या शक्यतांबाबत चर्चा करत आहेत. त्याचबरोबर त्यांच्या पुनरागमनासाठी मोहीमही वेग घेत आहे. एनव्हिडियाचे अनेक कर्मचारीदेखील त्यांच्या पुनरागमनाचे समर्थन करत आहेत. हुआंग यांना पुन्हा सीईओ पदावर आणण्यासाठी सिलिकॉन व्हॅलीतील प्रभावशाली व्यक्तींनी एक ‘वॉर रूम’देखील स्थापन केली आहे. तसेच व्हाइट हाऊसकडूनही पाठिंबा मिळवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

हे ही वाचा:

“भारताला लोकशाहीचे धडे देऊ नका”

झाडांवर जाहिराती लावणाऱ्यांनो सावधान!

पाकिस्तानातील ‘आका’च्या आदेशावरून राजस्थान रेल्वे ट्रॅकवर घडवला स्फोट

अर्शदीप-सिराज, अक्षरच्या गोलंदाजीमुळे भारताने मालिका जिंकली

मात्र, हुआंग यांचे पुन्हा सीईओ बनणे सोपे नसणार आहे. कारण, अलीकडेच अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेंट यांनी एनव्हिडियाच्या नेतृत्वात ‘मोठ्या बदलाची’ मागणी केली आहे. यावरून वॉशिंग्टनमधील प्रभावशाली धोरणकर्त्यांकडून हुआंग यांच्या पुनरागमनाला विरोध होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या आरोपांनंतर कंपनीतील त्यांची हिस्सेदारीही इतकी उरलेली नाही की, ते संचालक मंडळाच्या निर्णयाला आव्हान देऊ शकतील.

दरम्यान, एनव्हिडियाच्या अंतरिम मुख्य कार्यकारी अधिकारी कोलेट क्रेस्स कंपनीची परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न करत आहेत. गुंतवणूकदारांचा विश्वास कायम राखणे आणि कंपनीच्या कामकाजात स्थिरता सुनिश्चित करणे, हे त्यांच्यासमोरील सर्वात मोठे आव्हान आहे.

हुआंग यांच्याशी संबंधित वादामुळे कंपनीच्या अनुपालन प्रक्रियेची तपासणीही अधिक तीव्र झाली आहे. या प्रक्रिया आशियाई ग्राहकांना एआय चिप्स विकण्याशी संबंधित आहेत. या ग्राहकांचे चीनशी संबंध असण्याची शक्यता आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
342,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा