30 C
Mumbai
Tuesday, November 17, 2026
घरविशेषनोटबंदीने नक्षलवाद्यांचे आर्थिक कंबरडे मोडले

नोटबंदीने नक्षलवाद्यांचे आर्थिक कंबरडे मोडले

माजी माओवादी कमांडर भूपतीकडून खुलासा

Google News Follow

२०१६ मध्ये केंद्र सरकारने काळा पैसा आणि बनावट चलनाला आळा घालण्याच्या उद्देशाने नोटबंदीचा निर्णय घेतला. या निर्णयावरून त्यावेळी देशात मोठे राजकीय वादळ उठले. विरोधकांनी नोटबंदीच्या परिणामांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सरकारवर टीका केली. मात्र, आता माजी माओवादी कमांडर भूपती यानेच या निर्णयाचा नक्षलवादी संघटनेला कसा मोठा आर्थिक फटका बसला, याचा खुलासा केला आहे. जुन्या नोटा बदलता न आल्याने कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचे त्याने सांगितले. विशेष म्हणजे, स्वतःचे सुमारे २० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा दावाही त्याने केला आहे. भूपतीच्या या वक्तव्यामुळे विरोधकांचा फेक नरेटिव्ह उघड पडल्याची चर्चा सुरू झाली आहे.

मल्लोजुला वेणुगोपाल राव ऊर्फ भूपती याचे नोटबंदीच्या काळातील संघटनेच्या आर्थिक व्यवहारांबाबत माहिती सांगतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. जुन्या नोटा बदलण्यासाठी पुरेसा वेळ आणि व्यवस्था उपलब्ध न झाल्याने संघटनेची मोठी रोकड अडकून पडली. काही रक्कम बदलून देण्यासाठी मध्यस्थांकडे सोपवण्यात आली होती; मात्र त्यांनीही पैसे परत केले नाहीत. त्यामुळे संघटनेला मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागल्याचे त्याने सांगितले.

या आर्थिक संकटाचा परिणाम संघटनेच्या दैनंदिन कामकाजावरही झाला. जंगलात राहणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी कपडे, जीवनावश्यक वस्तू आणि इतर साहित्य खरेदी करणे कठीण झाले होते. पैशांची चणचण निर्माण झाल्यानंतर संघटनेला स्थानिक नागरिकांकडे मदत मागावी लागली. नागरिकांकडून मिळालेली आर्थिक मदत आणि धान्य यांच्या आधारे कार्यकर्त्यांच्या गरजा भागवण्यात आल्याचे भूपती याने सांगितले.

हे ही वाचा:

भारत-आसियान देशांचे संबंध स्थैर्यासाठी महत्त्वाचे

‘आम आदमी’चा शिशमहल आता आम जनतेसाठी खुला

लोकलमधील वादाचा निष्पाप प्रवाशाला फटका!

पहलगाम हल्ल्याच्या नावाखाली निवृत्त वकिलाला चार कोटींचा गंडा

मल्लोजुला वेणुगोपाल राव ऊर्फ भूपती हा माओवादी संघटनेच्या केंद्रीय समितीचा सदस्य आणि पॉलिट ब्युरोचा माजी सदस्य होता. संघटनेतील महत्त्वाच्या नेत्यांमध्ये त्याची गणना होत होती. तब्बल ३५ वर्षे माओवादी चळवळीत सक्रिय राहिल्यानंतर १५ ऑक्टोबर २०२५ रोजी त्याने गडचिरोली येथे शस्त्रांसह आत्मसमर्पण केले. त्याच्यासोबत सुमारे ६० माओवादी कार्यकर्त्यांनीही शस्त्रे खाली ठेवली होती.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
342,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा