31 C
Mumbai
Friday, November 20, 2026
घरस्पोर्ट्ससात्विक-चिरागची उपांत्य फेरीत धडक; रक्षिता स्पर्धेबाहेर!

सात्विक-चिरागची उपांत्य फेरीत धडक; रक्षिता स्पर्धेबाहेर!

Google News Follow

भारताची स्टार बॅडमिंटन जोडी सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी हाँगकाँग ओपन २०२६ स्पर्धेत दमदार कामगिरी करत उपांत्य फेरीत धडक मारली. उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात भारतीय जोडीने चीनच्या हू के युआन आणि लिन जियांग यी यांच्यावर २१-१२, १३-२१, २१-१६ अशी मात केली.

सात्विक आणि चिराग यांनी पहिल्या गेममध्ये सुरुवातीपासूनच वर्चस्व राखले. अवघ्या १३ मिनिटांत २१-१२ असा गेम जिंकत त्यांनी आघाडी घेतली. मात्र, दुसऱ्या गेममध्ये चिनी जोडीने जोरदार पुनरागमन करत २१-१३ असा गेम जिंकला. त्यामुळे सामना निर्णायक तिसऱ्या गेममध्ये पोहोचला.

तिसऱ्या गेममध्ये भारतीय जोडीने संयम आणि आक्रमक खेळाचा सुरेख मिलाफ साधला. मध्यंतराला ११-७ अशी आघाडी घेतल्यानंतर सात्विक-चिराग यांनी प्रतिस्पर्ध्यांना पुनरागमनाची संधी दिली नाही. अखेर २१-१६ असा गेम जिंकत त्यांनी उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले.

दरम्यान, महिला एकेरीत भारताच्या रक्षिता रामराजला पराभवाचा सामना करावा लागला. थायलंडच्या पोर्नपावी चोचुवोंगने रक्षिताचा २१-१९, २१-१६ असा पराभव केला. ५३ मिनिटे रंगलेल्या या सामन्यात रक्षिताने पहिल्या गेममध्ये चांगली झुंज दिली; मात्र चोचुवोंगने दोन्ही गेम जिंकत उपांत्य फेरीत प्रवेश केला. त्यामुळे महिला एकेरीतील भारताचे आव्हान संपुष्टात आले.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
342,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा