30 C
Mumbai
Tuesday, November 24, 2026
घरदेश दुनिया१६ डिसेंबरला बांगलादेशात जाण्याची हसीनांची घोषणा

१६ डिसेंबरला बांगलादेशात जाण्याची हसीनांची घोषणा

सरकारी विमानाची मागणी

Google News Follow

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी भारतातून मायदेशी परतण्याची तारीख निश्चित केली आहे. येत्या १६ डिसेंबरला बांगलादेशच्या विजय दिनानिमित्त आपण ढाक्यात परतणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. विशेष म्हणजे, दिल्लीहून ढाक्यापर्यंतच्या प्रवासासाठी बांगलादेशच्या सरकारी विमान कंपनीचे ‘बिमान बांगलादेश एअरलाइन्स’चे विमान उपलब्ध करून देण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

५ ऑगस्ट २०२४ रोजी बांगलादेशात विद्यार्थी आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर शेख हसीना यांना पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन देश सोडावा लागला होता. त्यानंतर त्यांनी भारतात आश्रय घेतला. आता दोन वर्षांहून अधिक काळानंतर त्यांनी पहिल्यांदाच मायदेशी परतण्याची निश्चित तारीख जाहीर केली आहे. १६ डिसेंबर हा बांगलादेशचा विजय दिन असून, १९७१ मध्ये याच दिवशी पाकिस्तानविरुद्धच्या मुक्तिसंग्रामाचा शेवट झाला होता.

हसीना यांनी बांगलादेश सरकारकडे प्रवासासाठी आवश्यक कागदपत्रे आणि सरकारी विमानाची व्यवस्था करण्याची मागणी केली आहे. ५ ऑगस्ट २०२४ रोजी त्यांना बांगलादेशच्या विमानातूनच भारतात आणण्यात आले होते. त्यामुळे आता त्यांना मायदेशी परत आणण्याची जबाबदारीही सरकारची असल्याचे त्यांच्या प्रवक्त्याने म्हटले आहे.

हे ही वाचा:

 

जेनसन हुआंग यांचे एनव्हिडियामध्ये पुनरागमन

दादरमध्ये फेरीवाल्यांचे ‘हप्ताराज’; क्यूआर कोडचा काळाबाजार!

भाग रहेमान भाग…

दरम्यान, हसीना यांच्यासमोरील कायदेशीर अडचणी कायम आहेत. २०२४ मधील विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसक कारवाईप्रकरणी बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने नोव्हेंबर २०२५ मध्ये त्यांना अनुपस्थितीत मृत्युदंडाची शिक्षा सुनावली होती. हसीना यांनी हे आरोप फेटाळून लावत खटला राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे म्हटले आहे. दुसरीकडे, बांगलादेशच्या परराष्ट्र राज्यमंत्री शमा ओबैद इस्लाम यांनी हसीना मायदेशात परतताच त्यांना अटक करून तुरुंगात पाठवले जाईल, असे स्पष्ट केले आहे. तसेच भारताने प्रत्यार्पण करारानुसार हसीना यांना बांगलादेशच्या ताब्यात द्यावे, अशी मागणीही सरकारने केली आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
342,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा