34 C
Mumbai
Wednesday, November 25, 2026
घरबिजनेसऑक्टोबरमध्ये भारतीय अर्थव्यवस्थेची ९ टक्क्यांनी झेप

ऑक्टोबरमध्ये भारतीय अर्थव्यवस्थेची ९ टक्क्यांनी झेप

जेफरीजचा अहवाल

Google News Follow

भारतीय अर्थव्यवस्थेने ऑक्टोबर महिन्यात दमदार कामगिरी करत गेल्या चार वर्षांतील सर्वोच्च वाढ नोंदवली आहे. जेफरीजच्या अहवालानुसार, देशातील आर्थिक घडामोडींचा वेग वार्षिक आधारावर ९ टक्क्यांवर पोहोचला आहे. सप्टेंबरच्या तुलनेत आर्थिक निर्देशांकात २.२ टक्क्यांची वाढ झाली. औद्योगिक क्षेत्रातील तेजी, सणासुदीच्या काळातील वाढलेली खरेदी आणि पायाभूत सुविधांशी संबंधित व्यवहार यामुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळाली आहे. जेफरीजचा हा निर्देशांक देशातील ३५ प्रमुख आर्थिक घटकांचा अभ्यास करून तयार करण्यात आला आहे.

औद्योगिक क्षेत्रातील कामगिरी या वाढीचे प्रमुख कारण ठरली. ऑक्टोबरमध्ये विजेच्या मागणीत वार्षिक आधारावर २२ टक्क्यांची वाढ झाली, तर डिझेलच्या मागणीत १२ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली. बंदरांवरील मालवाहतूक १९ टक्क्यांनी वाढली. याशिवाय सिमेंट उत्पादनात १५ टक्के आणि पोलादाच्या वापरात ७ टक्क्यांची वाढ झाली. या आकडेवारीतून देशातील बांधकाम, वाहतूक आणि औद्योगिक उत्पादन क्षेत्रांमध्ये आर्थिक हालचाली वेगाने सुरू असल्याचे स्पष्ट होते.
हे ही वाचा:
भारत-नेपाळ सीमेवर विशेष आर्थिक क्षेत्रे उभारण्याची तयारी

बर्ड फ्लूचा पोल्ट्री उद्योगाला मोठा फटका

पाकिस्तानातून दहशतवाद पसरवणाऱ्यांच्या जम्मू-काश्मिरातील जमिनी जप्त

अमेठीत ख्रिस्ती धर्मांतर करणाऱ्या १० जणांच्या टोळक्याला अटक

डिजिटल व्यवहारांमध्येही सकारात्मक चित्र दिसले. यूपीआय व्यवहारांच्या मूल्यात १८ टक्क्यांची वाढ झाली. मात्र वाहन क्षेत्रात संमिश्र कामगिरी पाहायला मिळाली. दुचाकी विक्रीत ४ टक्क्यांची वाढ झाली असताना प्रवासी वाहनांच्या विक्रीत ७ टक्क्यांची घट झाली. दिवाळीचा सण उशिरा आल्यामुळे ऑक्टोबरमध्ये खरेदीला चालना मिळाली. मात्र सणासुदीशी संबंधित सुट्ट्यांचा परिणाम नोव्हेंबरमधील आर्थिक आकडेवारीवर होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, ग्रामीण अर्थव्यवस्थेतील मंदी आणि वाढती महागाई ही चिंतेची बाब आहे. ग्रामीण भागातील वेतनवाढ मर्यादित राहिली असून रोजगार हमी योजनेतील कामाची मागणी वाढली आहे. बँकांच्या कर्जवाटपात १९.५ टक्क्यांची वाढ झाली असली, तरी ठेवींचा वेग तुलनेने कमी आहे. त्यामुळे ऑक्टोबरमधील आर्थिक तेजी उत्साहवर्धक असली, तरी तिचा लाभ ग्रामीण आणि शहरी अर्थव्यवस्थेच्या सर्व स्तरांपर्यंत पोहोचणे महत्त्वाचे ठरणार आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
343,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा