30 C
Mumbai
Wednesday, November 25, 2026
घरक्राईमनामाधर्मांतराच्या आरोपाखाली उत्तर प्रदेशात १० जणांना अटक

धर्मांतराच्या आरोपाखाली उत्तर प्रदेशात १० जणांना अटक

आर्थिक मदत, उपचार, शिक्षणाचे आमिष दाखवल्याचा आरोप

Google News Follow

उत्तर प्रदेशातील अमेठी जिल्ह्यात कथित धर्मांतर प्रकरणी पोलिसांनी १० जणांना अटक केली आहे. आर्थिक मदत, वैद्यकीय उपचार आणि मुलांच्या शिक्षणाची सुविधा देण्याचे आमिष दाखवून अनुसूचित जातीतील लोकांना ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी प्रवृत्त केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी पाच जण महाराष्ट्रातील, तर इतर आरोपी उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि ओडिशातील रहिवासी आहेत.

अमेठी जिल्ह्यातील सिंदुरवा गावातील रहिवाशांनी कमरौली पोलीस ठाण्यात यासंदर्भात तक्रार केली होती. प्रार्थना सभेच्या नावाखाली बाहेरून आलेले काही लोक धर्मांतर घडवून आणत असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी राजकुमार उर्फ जोएल आणि त्याची पत्नी सूर्यकला उर्फ मार्था यांच्या घरी छापा टाकला. त्यावेळी तेथे दोन दिवसांच्या धार्मिक कार्यक्रमासाठी २० ते २५ जण जमले होते. पोलिसांनी चौकशीदरम्यान १० जणांना अटक केली. घटनास्थळावरून धर्मांतराशी संबंधित चार पुस्तकेही जप्त करण्यात आली.

अमेठीचे पोलीस अधीक्षक सरवणन टी. यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा गट गेल्या सहा वर्षांपासून विविध राज्यांत सक्रिय होता. तमिळनाडू, झारखंड, महाराष्ट्र, ओडिशा, पंजाब, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांमध्ये त्यांचे काम सुरू होते. अनुसूचित जातीतील लोकांना लक्ष्य करून धर्मांतरासाठी प्रवृत्त केले जात असल्याचा पोलिसांचा दावा आहे. धर्मांतरानंतर संबंधित व्यक्तींना नवीन नावेही दिली जात असल्याचे तपासात समोर आले आहे.

हे ही वाचा:

होर्मुझच्या सामुद्रधुनीत चार तेलवाहू जहाजांना आग

चीनच्या अंतराळ मोहिमेत पाकिस्तानी अंतराळवीराचा सहभाग

अमेरिकेचा भारतासह १६ देशांना टॅरिफचा इशारा

दिल्लीतील कॅफेमध्ये तरुणीवर सामूहिक बलात्कार

मुंबईतील चर्चशी संबंध

पोलिसांच्या माहितीनुसार, या गटाचा मुंबईत नोंदणीकृत असलेल्या ‘रिव्हायव्हल चर्च’ या संस्थेशी संबंध आहे. या संस्थेच्या आर्थिक व्यवहारांचीही तपासणी केली जात आहे. निधीचा स्रोत शोधण्यासाठी प्राप्तिकर विभागाकडे चौकशीची विनंती करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, आरोपींविरोधात उत्तर प्रदेश बेकायदेशीर धर्मांतर प्रतिबंधक कायद्याच्या कलम ३ आणि ५(१) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
343,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा