34 C
Mumbai
Wednesday, November 25, 2026
घरक्राईमनामाकुर्ला प्रकरणातील हल्लेखोर अल्पवयीन मुलांचा मदरशाशी संबंध नाही!

कुर्ला प्रकरणातील हल्लेखोर अल्पवयीन मुलांचा मदरशाशी संबंध नाही!

मदरशात केवळ मुली, महिलांनाच प्रवेश

Google News Follow

कुर्ला येथील प्रमोद महाजन उद्यानात एका जोडप्याला मारहाण केल्याच्या घटनेवरून सुरू झालेल्या वादात घाटकोपरमधील जामियातुल फातिमातुज झहरा मदरशाने आपला कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. या मदरशात केवळ मुली आणि महिलांनाच प्रवेश दिला जातो. त्यामुळे जोडप्यावर हल्ला करणारे अल्पवयीन मुले या संस्थेशी संबंधित असल्याचा आरोप चुकीचा असल्याचे मदरशाच्या व्यवस्थापनाने म्हटले आहे.

मदरशाच्या व्यवस्थापनाचे प्रतिनिधी मोहम्मद मोईन शेख यांनी सांगितले की, संस्थेचा या घटनेशी कोणताही संबंध नाही. मदरशात केवळ मुली आणि महिलांना शिक्षण दिले जाते. पुरुषांना येथे प्रवेशही दिला जात नाही. तसेच, मदरशाला शुक्रवारी सुट्टी असते. अशा परिस्थितीत या घटनेशी संस्थेचे नाव जोडणे चुकीचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी जोडप्यावर हल्ला करणारे आठ अल्पवयीन मुले याच मदरशातून आल्याचा आरोप केला होता. या पार्श्वभूमीवर त्यांनी मदरशाच्या वैधतेबाबतही प्रश्न उपस्थित केले होते. मात्र, मदरशाच्या व्यवस्थापनाने हे आरोप फेटाळून लावले आहेत. या प्रकरणाला धार्मिक रंग देणे योग्य नसल्याचेही शेख यांनी म्हटले आहे.

महापालिकेकडून मदरशाला नोटीस

या वादाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने मदरशाला बांधकामाच्या तपासणीसाठी नोटीस बजावली आहे. २५ नोव्हेंबर किंवा पुढील कामकाजाच्या दिवशी महापालिकेचे अधिकारी परिसराची पाहणी आणि बांधकामाचे मोजमाप करणार आहेत. यासाठी मंजूर बांधकाम आराखडा, भोगवटा प्रमाणपत्र आणि अन्य आवश्यक कागदपत्रे तयार ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

हे ही वाचा:

पुण्यात शिवाजीनगर न्यायालयाबाहेर आरोपीवर गोळीबार करून कोयत्याने हल्ला

हिंदी महासागर देशांमधील दुवा ठरावा!

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही दीपथूनवर दिवा न लावल्याने वाद

पाकिस्तानातून दहशतवाद पसरवणाऱ्यांच्या जम्मू-काश्मिरातील जमिनी जप्त

दरम्यान, जोडप्याला मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी आठ अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले असून त्यांना निरीक्षणगृहात पाठवण्यात आले आहे. या घटनेचा तपास सुरू आहे. महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगानेही या प्रकरणाची दखल घेत मुंबई महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्तांकडून अहवाल मागवला आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
343,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा