34 C
Mumbai
Wednesday, November 25, 2026
घरस्पोर्ट्सभारतीय फलंदाजांनी जेकब डफीची 'डफली वाजवली'!

भारतीय फलंदाजांनी जेकब डफीची ‘डफली वाजवली’!

हेन्री म्हणतो तो क्लासी बॉलर!

Google News Follow

भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात महागडा ठरलेल्या न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज जेकब डफी याची वरिष्ठ गोलंदाज मॅट हेन्रीने पाठराखण केली आहे. ‘डफी हा दर्जेदार गोलंदाज आहे. त्याच्या क्षमतेबाबत आम्हाला कोणतीही शंका नाही,’ अशा शब्दांत हेन्रीने त्याच्यावरील विश्वास व्यक्त केला.

वेलिंग्टन येथे झालेल्या पहिल्या कसोटीत डफीने ३३ षटकांत २०१ धावा खर्च करत केवळ एक विकेट मिळवली होती. या निराशाजनक कामगिरीनंतर त्याच्यावर टीका होत होती. मात्र, हेन्रीने त्याची बाजू घेत संघासाठी त्याने दिलेल्या योगदानाचे कौतुक केले.

हेन्री म्हणाला, ‘जेकब डफी हा दर्जेदार गोलंदाज आहे. त्याने अनेक वर्षांपासून संघासाठी खेळण्याची वृत्ती दाखवली आहे. आम्ही एखादी वेगळी रणनीती आखण्याचा सल्ला दिला, तर तो स्वतःच्या वैयक्तिक आकडेवारीचा विचार करत नाही. त्याच्या कौशल्यावर कोणताही प्रश्नचिन्ह नाही.’

बेसिन रिझर्व्हच्या खेळपट्टीवर चेंडू स्लिपपर्यंत फारसा जात नव्हता. त्यामुळे डफीला वैयक्तिक आकडेवारीची चिंता न करता बाऊन्सर टाकण्याची भूमिका देण्यात आली होती. त्याने संघाच्या रणनीतीनुसार गोलंदाजी केली, असेही हेन्रीने स्पष्ट केले.

डफीने न्यूझीलंडकडून आतापर्यंत ५ कसोटी सामन्यांत २६, २७ एकदिवसीय सामन्यांत ४९ आणि ५२ टी-२० सामन्यांत ६७ विकेट्स घेतल्या आहेत. आता भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत डफी दमदार पुनरागमन करेल, अशी न्यूझीलंडला अपेक्षा आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
343,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा