27 C
Mumbai
Friday, November 27, 2026
घरक्राईमनामाहसीनांच्या माजी उप प्रसिद्धी सचिवासह तिघांना अटक

हसीनांच्या माजी उप प्रसिद्धी सचिवासह तिघांना अटक

पुनरागमनाच्या चर्चेने बांगलादेशात तणाव

Google News Follow

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या मायदेशी परतण्याच्या चर्चेमुळे देशातील राजकीय वातावरण तापले आहे. हसीना १६ डिसेंबर रोजी बांगलादेशात परतण्याची शक्यता व्यक्त होत असतानाच, त्यांच्या माजी उप प्रसिद्धी सचिवासह तिघांना अटक करण्यात आली आहे. संभाव्य हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर सरकारने आठ जिल्ह्यांमध्ये सीमा सुरक्षा दलाच्या (बीजीबी) १०८ तुकड्या तैनात केल्या आहेत. यापैकी ५६ तुकड्या हसीना यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या गोपालगंजमध्ये तैनात आहेत.

हसीना यांचे माजी माजी उप प्रसिद्धी सचिव के. एम. शकावत मून, माजी उपजिल्हाधिकारी मोहम्मद इलियास हुसेन आणि वकील सूफी मोहम्मद अल मामून यांना २६ नोव्हेंबर रोजी ढाक्यातील धनमंडी परिसरातून अटक करण्यात आली. ‘द डेली स्टार’च्या वृत्तानुसार, सत्ताधारी बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीच्या (बीएनपी) विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांना ताब्यात घेऊन पोलिसांच्या हवाली केले.

गोपालगंजमध्ये विशेष बंदोबस्त

ढाका, नारायणगंज, गाझीपूर, मैमनसिंग, चट्टोग्राम, कॉक्स बाजार आणि गोपालगंजसह आठ जिल्ह्यांमध्ये सुरक्षा वाढवण्यात आली आहे. चार तुकड्या राखीव ठेवण्यात आल्या आहेत. दरम्यान, नोव्हेंबरच्या सुरुवातीपासून राजकीय हिंसाचाराच्या घटनांमध्ये किमान चार जणांचा मृत्यू झाला आहे. रेल्वे, बस आणि वाहनांची जाळपोळ तसेच पोलीस ठाण्यांवरील हल्ल्यांच्या घटनाही घडल्या आहेत. अवामी लीगकडून २९ आणि ३० नोव्हेंबर रोजी देशव्यापी बंदची हाक देण्यात आली आहे.

हे ही वाचा : 

ममतांच्या भावाची पुतण्या अभिषेक यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार

नोकरीची संधी देत टेस्लाकडून भारतीय बाजारपेठेत प्रवेश करण्याची योजना

कॅनडातील टोरंटो विमानतळावर विमान उलटले; १८ प्रवासी जखमी

ज्ञानेश कुमार यांची मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती

दरम्यान, दोन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनाही अटक करण्यात आली आहे. शेख हसीना ऑगस्ट २०२४ मध्ये सत्तांतरानंतर भारतात आल्या होत्या. आंदोलनादरम्यान आंदोलकांवरील कारवाईप्रकरणी बांगलादेशच्या विशेष न्यायाधिकरणाने त्यांना त्यांच्या अनुपस्थितीत मृत्युदंडाची शिक्षा सुनावली आहे. बांगलादेशने त्यांच्या प्रत्यार्पणाची मागणी भारताकडे केली आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
343,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा