30.9 C
Mumbai
Friday, November 27, 2026
घरराजकारणरितब्रत बॅनर्जींची विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती रद्द

रितब्रत बॅनर्जींची विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती रद्द

तृणमूलमधील बंडखोर गटाला धक्का

Google News Follow

पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या बंडखोर गटाला कोलकाता उच्च न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. रितब्रत बॅनर्जी यांची विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी करण्यात आलेली नियुक्ती न्यायालयाने शुक्रवारी रद्द केली. तसेच विधानसभा अध्यक्षांना या पदाबाबत नव्याने विचार करून १० दिवसांच्या आत कारणांसह निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहेत. न्यायमूर्ती कृष्णा राव यांच्या एकलपीठाने हा निर्णय दिला.

पश्चिम बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदावरून तृणमूल काँग्रेसमध्ये वाद सुरू होता. पक्षाने ज्येष्ठ आमदार सोवांदेब चट्टोपाध्याय यांची या पदासाठी निवड केली होती. मात्र, पक्षातून फुटून बाहेर पडलेल्या रितब्रत बॅनर्जी यांच्या गटानेही या पदावर दावा केला. विधानसभा अध्यक्षांनी जूनमध्ये बंडखोर गटाला स्वतंत्र विधिमंडळ पक्ष म्हणून मान्यता दिली आणि रितब्रत बॅनर्जी यांची विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती केली होती.

या निर्णयाला सोवांदेब चट्टोपाध्याय यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. पक्षाने आपली अधिकृत निवड केली असताना विधानसभा अध्यक्षांनी बंडखोर गटाच्या मागणीला मान्यता देऊन रितब्रत यांची नियुक्ती केल्याचा त्यांचा आक्षेप होता. रितब्रत बॅनर्जी यांना जवळपास ६० आमदारांचा पाठिंबा असल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे त्यांचा गट पक्षांतरबंदी कायद्यातील दोन तृतीयांश सदस्यांच्या निकषाची पूर्तता करत असल्याचा दावा करण्यात आला होता.

हे ही वाचा : 

लोकसभा जागांमध्ये ५० टक्के वाढीला कॅबिनेटची मंजुरी

२७ देशांमध्ये ‘रामायण’ सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट

‘रामायण’ चित्रपटावर आक्षेप असेल तर स्वतःचा चित्रपट बनवा!

महिला आरक्षण विधेयकासाठी सरकारचे बहुमताचे गणित जुळणार?

या प्रकरणी यापूर्वी उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने ऑगस्टमध्ये रितब्रत यांना अंतरिम स्वरूपात विरोधी पक्षनेतेपदी कायम राहण्याची परवानगी दिली होती. मात्र, मूळ याचिकेवरील सुनावणी पूर्ण करून निर्णय घेण्याचे निर्देश एकलपीठाला दिले होते. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयानेही या प्रकरणाचा जलदगतीने निपटारा करण्यास सांगितले होते. आता उच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांचा जुना निर्णय रद्द केला आहे. मात्र, विरोधी पक्षनेतेपदी कोणाची नियुक्ती करावी, हे न्यायालयाने स्वतः ठरवलेले नाही. त्याबाबत नव्याने निर्णय घेण्याची जबाबदारी विधानसभा अध्यक्षांवर सोपवण्यात आली आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
343,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा