30.9 C
Mumbai
Friday, November 27, 2026
घरराजकारणलोकसभा जागांमध्ये ५० टक्के वाढीला कॅबिनेटची मंजुरी

लोकसभा जागांमध्ये ५० टक्के वाढीला कॅबिनेटची मंजुरी

मोदी सरकारची डीलिमिटेशन बिलाची तयारी सुरू

Google News Follow

केंद्रीय मंत्रिमंडळाने शुक्रवार, २७ नोव्हेंबर रोजी मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षणाशी संबंधित घटनादुरुस्ती विधेयकातील सुधारणांना केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. या प्रस्तावानुसार, देशातील सर्व राज्यांमधील लोकसभेच्या जागांमध्ये ५० टक्के वाढ केली जाणार आहे. तसेच २०५१ पर्यंत राज्यांमधील जागांचे सुधारित संख्याबळ कायम ठेवले जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

संसदेच्या ३० नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या विशेष अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. या अधिवेशनात महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचनेशी संबंधित विधेयकांमध्ये सुधारणा करून ती पुन्हा मांडण्याची सरकारची तयारी आहे. लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याचा या विधेयकाचा उद्देश आहे.

सध्या लोकसभेची सदस्यसंख्या ५४३ आहे. प्रस्तावित वाढीनंतर राज्यांसाठीच्या जागांची संख्या सुमारे ८१५ पर्यंत जाण्याची शक्यता आहे. केंद्रशासित प्रदेशांसाठी ३५ जागांची तरतूद केल्यास लोकसभेची कमाल सदस्यसंख्या ८५० होऊ शकते. मात्र, राज्यांमधील जागांचे परस्पर प्रमाण १९७१ च्या जनगणनेच्या आधारे २०५१ पर्यंत कायम ठेवण्याचा प्रस्ताव आहे. मतदारसंघांच्या अंतर्गत सीमांची पुनर्रचना मात्र २०११ च्या जनगणनेच्या आधारे करण्याची तरतूद अपेक्षित आहे.

हे ही वाचा : 

२७ देशांमध्ये ‘रामायण’ सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट

‘रामायण’ चित्रपटावर आक्षेप असेल तर स्वतःचा चित्रपट बनवा!

महिला आरक्षण विधेयकासाठी सरकारचे बहुमताचे गणित जुळणार?

मुख्यमंत्री विजय यांचा निवडणूक विजय न्यायालयीन कसोटीवर

यापूर्वी एप्रिलमध्ये सरकारने मांडलेले १३१ वे घटनादुरुस्ती विधेयक लोकसभेत मंजूर होऊ शकले नव्हते. १७ एप्रिल रोजी झालेल्या मतदानात विधेयकाच्या बाजूने २९८, तर विरोधात २३० मते पडली होती. घटनादुरुस्तीसाठी आवश्यक असलेले दोन तृतीयांश बहुमत मिळवण्यात सरकारला अपयश आले होते. दक्षिणेकडील राज्यांचे लोकसभेतील प्रतिनिधित्व कमी होण्याची भीती व्यक्त केली जात होती. नव्या प्रस्तावात प्रत्येक राज्यासाठी समान प्रमाणात जागा वाढवण्याची तरतूद केल्याने या आक्षेपांना उत्तर देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे मानले जात आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
343,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा