30 C
Mumbai
Sunday, November 29, 2026
घरस्पोर्ट्सहेल्मेटला चेंडू आदळल्यामुळे आकाश दीपऐवजी प्रसिद्ध कृष्णा मैदानात

हेल्मेटला चेंडू आदळल्यामुळे आकाश दीपऐवजी प्रसिद्ध कृष्णा मैदानात

दुसऱ्या डावात मिळणार संधी

Google News Follow

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना हेगली ओव्हलच्या मैदानावर खेळला जात आहे. गोलंदाजीमध्ये पाच बळी घेतल्यानंतर आकाश दीपने फलंदाजीतही महत्त्वपूर्ण योगदान देत २९ धावा केल्या. मात्र, फलंदाजीदरम्यान दोन वेळा चेंडू हेल्मेटला लागल्याने आकाश दीप आता दुसऱ्या डावात मैदानात उतरणार नाही. त्याच्या जागी ‘कन्कशन सबस्टिट्यूट’ अर्थात बदली खेळाडू म्हणून प्रसिद्ध कृष्णाला संधी देण्यात आली आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आपल्या ‘एक्स’ या सोशल मीडिया मंचावरून याबाबत माहिती दिली आहे. बीसीसीआयने सांगितले की, “क्राइस्टचर्चमध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी फलंदाजी करताना आकाश दीपच्या हेल्मेटला चेंडू लागला. त्याच्या जागी प्रसिद्ध कृष्णाचा कन्कशन सबस्टिट्यूट म्हणून संघात समावेश करण्यात आला आहे. बीसीसीआयची वैद्यकीय टीम त्याच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे.”

आकाश दीप संघाबाहेर झाल्याने भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. पहिल्या डावात तो भारताचा सर्वाधिक यशस्वी गोलंदाज ठरला होता. त्याने न्यूझीलंडच्या पाच फलंदाजांना माघारी धाडले होते. फलंदाजीतही त्याने ध्रुव जुरेलसोबत ७४ चेंडूंमध्ये ४६ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. आकाशने ५२ चेंडूंचा सामना करताना चार चौकारांच्या मदतीने २९ धावा केल्या.

हे ही वाचा:

न्यूझीलंड २४३ धावांच्या आघाडीसह मजबूत स्थितीत

‘आप’चा चौथा आमदार अकाली दलाच्या गोटात!

व्यसनाधीनता, अमली पदार्थ हे तरुणांच्या स्वप्नांसमोरील मोठे अडथळे

झारखंडमध्ये भीषण अपघातात १३ भाविकांचा मृत्यू

पहिल्या कसोटी सामन्यात प्रसिद्ध कृष्णाची कामगिरी विशेष प्रभावी ठरली नव्हती. त्यावेळी तो आपल्या गोलंदाजीतील योग्य टप्पा आणि दिशा राखण्यात अपयशी ठरताना दिसला होता. भारताचा संपूर्ण पहिला डाव २४६ धावांवर आटोपला. भारताकडून जुरेलने उत्कृष्ट फलंदाजी करताना १७० चेंडूंमध्ये १४ चौकारांच्या मदतीने ८८ धावांची दमदार खेळी केली. तर केएल राहुलने २५ आणि ऋषभ पंतने २३ धावांचे योगदान दिले.

न्यूझीलंडने पहिल्या डावाच्या आधारावर ११० धावांची आघाडी मिळवली होती. गोलंदाजीत न्यूझीलंडकडून काइल जेमिसनने चार बळी घेतले, तर नॅथन स्मिथ, मॅट हेन्री आणि जेकब डफी यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवले. यापूर्वी न्यूझीलंडचा संपूर्ण पहिला डाव ३५६ धावांवर संपुष्टात आला होता.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
343,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा