30 C
Mumbai
Sunday, November 29, 2026
घरस्पोर्ट्सशुभम जामसुदकर, जीवन सकपाळ ठरले विजेते

शुभम जामसुदकर, जीवन सकपाळ ठरले विजेते

Google News Follow
श्री मावळी मंडळ ठाणे संस्थेने आयोजित केलेल्या ३७ वी जिल्हास्तरीय व अंतर्गत शरीरसौष्ठव “श्री मावळी मंडळ श्री” स्पर्धा शनिवार दिनांक  २८ नोव्हेंबर २०२६ रोजी संस्थेच्या क्रीडांगणात मोठ्या उत्साहात पार पडली.  या स्पर्धेमध्ये अंतर्गत व जिल्हास्तरीय मिळून एकूण ११ व ६० अशा ७१ स्पर्धकांनी भाग घेतला होता. सदर स्पर्धेत अंतर्गत  श्री मावळी मंडळ श्री किताब शुभम मनोहर जामसुदकर यांने पटकविला.तर, जिल्हास्तरीय श्री मावळी मंडळ श्री किताब अपोलो जिम कळवा या व्यायाम शाळेच्या  जीवन अशोक सकपाळ याने पटकविला.
या स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष सुधाकर मोरे यांनी केले. अंतर्गत व जिल्हास्तरीय किताब विजेत्यांना बक्षिस देण्यासाठी प्रमुख पाहुणे  श्री. हार्दिक दयानंद पाटील (आंतरराष्ट्रीय ‘आर्यनमॅन’ या ॲथेलीट व उद्योजक ) हे उपस्थित होते.  त्यांच्याबरोबर संस्थेचे अध्यक्ष सुधाकर मोरे, उपाध्यक्ष मनीष मुंदडा, खजिनदार रिक्सन फर्नांडिस, चिटणीस रमण गोरे,  सह  चिटणीस चिंतामणी पाटील, पॅट्रिक फर्नांडीस  हे उपस्थित होते.
हे ही वाचा:
ह्या स्पर्धेतील सांघिक विजेतेपद अपोलो जिम कळवा (१७ गुण),   तर सांघिक उपविजेतेपद  पॉवर फिटनेस उल्हासनगर (१५ गुण) यांना मिळाले.
ह्या स्पर्धेचे निकाल पुढीलप्रमाणे:
१. स्पर्धेतील सर्वोत्तम शरीर सौष्ठव प्रदर्शक विजेता – अक्षय संजय शिंदे (श्रीमंत योगी जिम, दिवा)
२. स्पर्धेतील सर्वोत्तम शरीर सौष्ठव प्रदर्शक उपविजेता – शुभम कैलास गायकवाड (नवाले फिटनेस जिम भिवंडी)
National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
343,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा