27.7 C
Mumbai
Friday, October 30, 2026
घरदेश दुनियातालिबानला विनोदाचेही वावडे?

तालिबानला विनोदाचेही वावडे?

Google News Follow

अफगाणिस्तानमध्ये एका प्रसिद्ध हास्य कलाकाराची (कॉमेडियन) हत्या करण्यात आली आहे. तालिबानी दहशतवाद्यांनी ही हत्या केल्याचं स्पष्ट झालं आहे. नजर मोहम्मद म्हणजेच खाश ज्वान असं मृत कलाकाराचे नाव आहे. या घटनेचा एक व्हिडीओ देखील व्हायरल झालाय. या व्हिडीओमध्ये काही तालिबानी दहशतवादी पीडित खाश जान यांना मारहाण करताना आणि शिवीगाळ करताना दिसत आहेत. तालिबानचा प्रवक्ता जबिउल्ला मुजाहिद यानेही या घटनोला दुजोरा दिला आहे.

तालिबानचा प्रवक्ता मुजाहिद याने दिलेल्या माहितीनुसार, कॉमेडियन खाश यांची हत्या करणाऱ्या आरोपींना अटक करण्यात आलीय. त्यांच्यावर न्यायालयात खटला चालवण्यात येईल, असंही मुजाहीद यांनी म्हटलं. खाश यांना अटक करून त्यांना न्यायालयासमोर हजर करायला हवं होतं. मात्र, तसं न करता त्यांची हत्या करण्यात आली. म्हणून हत्या करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे.

हे ही वाचा:

शिवशाहीर बाबासाहेबांचा अद्भूत शिवमय प्रवास आता ऑडिओ स्वरूपात

‘अजितदादा… हे म्हणजे कुठला चित्रपट बघावा हे राज कुंद्रांनी सांगण्यासारखं’

‘तुम्ही नुसतेच पर्यावरण मंत्री’…कोकणवासी कडाडले

जी पद्धत स्वीकारायच्ये ती स्वीकारा, पण तातडीने मदत जाहीर करा!

दरम्यान खाश हे अफगाण पोलीस दलाचे सदस्य होते. अमेरिकेच्या सैन्यासोबत काम केलेल्यांना सध्या तालिबानी निशाणा (लक्ष्य) करत आहेत. तालिबानचं नियंत्रण असलेल्या भागात अशा अनेकांना कैद करण्यात आलंय. त्यामुळेच तालिबानने खाश यांच्या हत्येवर दिलेल्या स्पष्टीकरणाकडे संशयाने पाहिलं जातंय. अफगाणिस्तानात स्थानिकांनी अमेरिका आणि नेटो देशांच्या सैन्याला यापूर्वी मदत केली होती. आता या नागरिकांना तालिबान लक्ष्य करत त्यांचे उत्पिडन आणि अनेक वेळा खून करत आहे. तालिबानच्या या कृत्यामुळे देशातून बाहेर पडणाऱ्यांची संख्या वाढत आहे. हे नागरिक पाश्चिमात्य देशांकडे मदतीची याचना करत आहेत.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
340,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा