27.4 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
घरविशेषलोवलीनाचा बुक्का, मेडल पक्का

लोवलीनाचा बुक्का, मेडल पक्का

Google News Follow

Related

टोकियो ऑलिम्पिक २०२० मध्ये भारताचे आणखीन एक पदक निश्चित झाले आहे. भारताची महिला बॉक्सर लोवलीना बोरगोहेन हिने उपांत्य फेरीत धडक मारली आहे. तिच्या या कामगिरीमुळेच भारताचे ऑलिम्पिकमध्ये आणखीन एक पदक पटकावणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

शुक्रवार, ३० जुलै रोजी सकाळी भारतीय बॉक्सर लोवलीना बोरगोहेन हिचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना पार पडला. या सामन्यात तिच्यासमोर तैवानची बॉक्सर निएन चीन चेन हिचे आव्हान होते. ६९ किलो वेल्टरवेट प्रकारातील उपांत्यपूर्व फेरीचा हा सामना रंगला. यामध्ये तैवानच्या निएन चीन चेनहिला लोवलीनाने ४-१ अशी मात दिली.

हे ही वाचा:

शिवशाहीर बाबासाहेबांचा अद्भूत शिवमय प्रवास आता ऑडिओ स्वरूपात

‘अजितदादा… हे म्हणजे कुठला चित्रपट बघावा हे राज कुंद्रांनी सांगण्यासारखं’

‘तुम्ही नुसतेच पर्यावरण मंत्री’…कोकणवासी कडाडले

हसरंगाने भारताला रडवले…टी२० मालिकेवर लंकेची मोहर

या संपूर्ण सामन्यात लोवलीनाने सुंदर खेळाचे प्रदर्शन केले. सामन्यात ती आक्रमकपणे खेळताना दिसली, पण त्याचवेळी ती डोक्याने मात्र प्रचंड शांत होती. तीन फेर्‍यांच्या या खेळामध्ये पहिल्या फेरीत लोवलीना आक्रमण करताना दिसली, तर हाच खेळ तिने दुसऱ्या फेरीतही सुरू ठेवला. पण दोन फेऱ्यांमध्ये चांगली बढत मिळवल्यानंतर तिसऱ्या फेरीत मात्र तिने बचावात्मक खेळाचे प्रदर्शन केले. तीन फेऱ्यांचा हा खेळ संपल्यानंतर एकूण चार परीक्षकांनी लोवलीनाच्या बाजूने निकाल देत तिला विजयी घोषित केले.

या विजयासह लोवलीनाने महिला बॉक्सिंगच्या ६९ किलो वेल्टरवेट प्रकारात उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. बॉक्सिंग या खेळाच्या नियमानुसार चार पदक विजेते काढले जातात. या मध्ये अंतिम सामना जिंकणाऱ्या स्पर्धकाला सुवर्ण, अंतिम सामन्यात पराभूत होणाऱ्या स्पर्धकाला रौप्य तर उपांत्य फेरीत पराभूत होणाऱ्या दोन स्पर्धकांना कांस्य पदक मिळते. त्यामुळेच भारताचे टोकियो ऑलिम्पिकमधले आणखीन एक पदक हे निश्चित झाले आहे. पण लोवलीना हिने सुवर्ण पदक पटकवावे अशी समस्त भारतवासीयांची इच्छा आहे.

लोवलीना हिच्या सोबतच भारताची आघाडीची तिरंदाज दीपिका कुमारी हिनेदेखील उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. आज सकाळी साडे अकरा वाजता तिचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना रंगणार आहे. तिच्यासमोर दक्षिण कोरियाच्या एस.ऍन हिचे आव्हान असेल.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा