28.4 C
Mumbai
Friday, October 30, 2026
घरराजकारणगीतकार जावेद अख्तरविरुद्ध गुन्हा दाखल

गीतकार जावेद अख्तरविरुद्ध गुन्हा दाखल

Google News Follow

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (आरएसएस) तालिबानशी तुलना केल्याबद्दल मुंबई पोलिसांनी गीतकार जावेद अख्तरविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. स्थानिक वकील संतोष दुबे यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी गीतकार जावेद अख्तर यांनी एका मुलाखतीदरम्यान आरएसएसची तुलना तालिबानशी केली होती. यापूर्वीही जावेद अख्तर यांच्याविरोधात बदनामीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

‘स्थानिक वकील संतोष दुबे यांच्या तक्रारीवरून जावेद अख्तरविरोधात मुलुंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे,’ अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने एएनआयला दिली. पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार जावेद यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम ५०० (बदनामीसाठीची शिक्षा) अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे. एका मुलाखतीदरम्यान, आरएसएसचे नाव न घेता, जावेद अख्तर म्हणाले होते की, ‘तालिबानला एक इस्लामिक देश हवा आहे आणि या लोकांना हिंदू राष्ट्र बनवायचे आहे.’

हे ही वाचा:

अफगाणिस्तानमधील आर्थिक, सामाजिक ढाचा कोसळण्याच्या मार्गावर

यंदा कबड्डी.. कबड्डी.. चा आवाज घुमणार बंगळुरूमध्ये!

कृषी कायद्यांना स्थिगिती दिल्यानंतर तुम्ही कशाचा विरोध करताय?

‘मराठवाडा आणि विदर्भ हे सरकारच्या अजेंड्यावरचं नाही’

याआधी, जेव्हा जावेद अख्तर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल वक्तव्य केले होते, तेव्हा एका वकीलाने त्यांना कायदेशीर नोटीस पाठवून माफी मागायला सांगितली होती. न्यायालयाने जावेद अख्तर यांना नोटीस बजावली असून १२ नोव्हेंबरला न्यायालयात हजर राहण्यास सांगितले आहे. यापूर्वीही जावेद अख्तरविरोधात ठाणे जिल्ह्यातील न्यायालयात बदनामीचा खटला दाखल करण्यात आला आहे. हा खटला आरएसएस कार्यकर्ता विवेक चंपानेरकर यांनी भरला आहे. चंपानेरकर यांनी नुकसानभरपाई म्हणून एक रुपयाची मागणी केली आहे. ज्याची सुनावणी १२ नोव्हेंबर रोजी होणार आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
340,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा