30 C
Mumbai
Sunday, December 5, 2021
घरराजकारण'मराठवाडा आणि विदर्भ हे सरकारच्या अजेंड्यावरचं नाही'

‘मराठवाडा आणि विदर्भ हे सरकारच्या अजेंड्यावरचं नाही’

Related

राज्याच्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे सध्या मराठवाडा, विदर्भामध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या पाहणी दौऱ्यावर आहेत. फडणवीस हे आज लातूरमध्ये दौऱ्यावर असून तिथून ते उस्मानाबादमध्ये पाहणीसाठी जाणार आहेत. दरम्यान माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या परिस्थितीबद्दल माहिती दिली. शेतकऱ्यांना सरकारकडून कुठलीही मदत मिळत नाही, विमा कंपन्यांकडून कोणत्याही प्रकारची मदत मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला असल्याचे त्यांनी सांगितले. लवकरात लवकर मदत मिळावी, अशी मागणी पूरग्रस्तांकडून विशेषतः शेतकऱ्यांकडून होत असल्याचेही त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांना दसऱ्यापूर्वी त्यांच्या बँक खात्यात मदत मिळावी, अशी भूमिका विरोधी पक्षाने घेतली आहे.

‘आमचे (भाजप) सरकार असताना शेतकऱ्यांना मदत मिळत होती, मग आता का मिळत नाही,’ असा जाब त्यांनी सरकारला विचारला आहे. सरकारच्या मनात असेल तर ते मदत देऊ शकतात. मात्र, सरकारमध्ये संवेदनाचा अभाव, समन्वयाचा अभाव आहे आणि केवळ कागदावर कामे चालू आहेत, अशी टीका त्यांनी केली.

‘मराठवाडा आणि विदर्भ हे सरकारच्या अजेंड्यावरचं नाही. हे सरकार विदर्भ, मराठवाडा विरोधी सरकार आहे. आता दौऱ्यासाठी उशीर झाला आहे त्यामुळे मंत्रिमंडळ बैठक घेऊन पॅकेज घोषित करावं आणि ते कागदावर न ठेवता शेतकऱ्यांना कसे पोहचेल हे पाहावं,’ असे फडणवीस यांनी म्हटले आहे.

 

‘सरकार जर मदत करणार नसेल, तर त्याविरुद्ध आम्ही मैदानात उतरू, रस्त्यावर उतरू आणि सरकारच्या विरोधात आंदोलन केल्याशिवाय शांत बसणार नाही. मुख्यमंत्री तर नाहीच पण अनेक पालकमंत्र्यांनी देखील त्यांच्या जिल्ह्यांची पाहाणी केलेली नाही. दौरा करायचा असेल तर तो लवकर करायला हवा, असे त्यांनी सांगितले. दौरा नसेल करायचा, तर नका करू पण, शेतकऱ्यांना मदत करा.

हे ही वाचा:

सकाळी सकाळी एनसीबी अधिकारी धडकले पुन्हा क्रूझवर; आणखी आठ जण ताब्यात!

लखीमपूर खिरीमधील मृतांना सरकारकडून ४५ लाखांची मदत

बोरिवली स्थानक परिसरात ‘दंगा करतोय रिक्षावाला!’

हमी कालावधीतच खड्डे पडण्याची हमी!

धरणाचे पाणी मोठ्या प्रमाणात सोडण्यात आले, मात्र त्या पाण्याला वाहून जाण्यासाठी तेवढे पात्र उपलब्ध नसल्यामुळे अनेक ठिकाणी शेतामध्ये पाणी जाऊन शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्यामुळे या पाणी सोडण्याच्या प्रकरणाची चौकशी व्हावी आणि यापुढे धरणांमधून पाणी किती सोडावे यावर अभ्यास करून तसे नियोजन करावे, असे त्यांनी म्हटले आहे.

फडणवीसांच्या दौऱ्यावर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या अग्रलेखातून संजय राऊत यांनी टीका केली होती. त्यावर आता फडणवीसांनी उत्तर दिले आहे. संजय राऊत हे ऑफिसमधले नेते आहेत. त्यांनी कधी शेतकऱ्यांचे दुःख पाहिलेले नाही. अग्रलेख लिहून हे नेते झाले आहेत. ते कागदावरचे नेते आहेत, असे फडणवीस म्हटले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,510अनुयायीअनुकरण करा
4,880सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा