34 C
Mumbai
Friday, April 26, 2024
घरदेश दुनियाहाथरसनंतर लखीमपूरमध्ये प्रियांका गांधींचा ‘ड्रामा’

हाथरसनंतर लखीमपूरमध्ये प्रियांका गांधींचा ‘ड्रामा’

Google News Follow

Related

हाथरस येथे झालेल्या बलात्काराच्या घटनेत स्वतःच्या प्रसिद्धीसाठी आकांडतांडव करणाऱ्या प्रियांका गांधी वड्रा यांनी आता त्याची पुनरावृत्ती लखीमपूर येथील घटनेतही केली आहे. त्यावरून सोशल मीडियावर जोरदार टीका केली जात आहे.

लखीमपूर येथे चार शेतकरी गाडीखाली चिरडून मरण पावल्याची घटना घडल्यानंतर राजकारण तापले आहे. त्याचा फायदा उठविण्यासाठी प्रियांका गांधी सरसावल्या. त्यांनी घटनास्थळी पोहोचण्याचा प्रयत्न केला पण पोलिसांनी त्यांना अडविले. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न असल्यामुळे तिथे जाऊ दिले जाणार नाही असे पोलिसांनी सांगितल्यानंतरही प्रियांका गांधी पोलिसांशी वाद घालत होत्या.

यासंदर्भातील व्हीडिओ प्रसिद्ध झाला असून त्यात प्रियांका पोलिसांना दमदाटी करत म्हणत आहेत की, तुम्ही मला पोलिस व्हॅनमध्ये जबरदस्तीने बसवणार आहात का? जर तुम्ही तसे केलेत तर ते माझे अपहरण असेल. तुम्ही जे करत आहात ते मला चांगले समजते. महिला पोलिस अधिकाऱ्यांनी उद्देशून प्रियांका गांधी म्हणाल्या की, महिला पोलिसांना माझ्यासमोर आणू नका. महिलांशी कसे बोलायचे हे शिका. तुम्हाला कळते आहे का?

 

हे ही वाचा:

लखीमपूर प्रकरणात खलिस्तानी कनेक्शन?

सकाळी सकाळी एनसीबी अधिकारी धडकले पुन्हा क्रूझवर; आणखी आठ जण ताब्यात!

हमी कालावधीतच खड्डे पडण्याची हमी!

लखीमपूर खिरीमधील मृतांना सरकारकडून ४५ लाखांची मदत

 

पोलिसांनी त्यांना सांगितले की, जर तुम्ही थांबला नाहीत तर आम्ही तुम्हाला ताब्यात घेऊ त्यावर प्रियांका म्हणाल्या की, मला अटक करा. मी आनंदाने तुमच्यासोबत यायला तयार आहे. तुम्ही मला ढकलू नका. जर तुम्ही असे केलेत तर माझे अपहरण केल्याचा हा प्रयत्न असेल. माझा विनयभंग केल्याचे हे प्रकरण असेल. मला स्पर्श करून तर पाहा!

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा