30 C
Mumbai
Tuesday, October 27, 2026
घरविशेषमहाराष्ट्राचा किशोर संघ बाद फेरीत; मुली मात्र साखळीतच गारद 

महाराष्ट्राचा किशोर संघ बाद फेरीत; मुली मात्र साखळीतच गारद 

Google News Follow
गतवेळच्या विजेत्या महाराष्ट्राने दोन साखळी सामन्यात विजय मिळवीत अ गटात अग्रस्थान मिळवीत “३१व्या किशोर/किशोरी गट राष्ट्रीय अजिंक्यपद” निवड चाचणी स्पर्धेत बाद फेरी गाठली. महाराष्ट्राच्या मुलींचे आव्हान दोन पराभवामुळे साखळीतच संपले.उदमपूर जिल्ह्यातील नानकपुरी, सुद्रापूर येथे झालेल्या सकाळच्या सत्रातील पहिल्या सामन्यात महाराष्ट्राने त्रिपुराचा ४६-०९असा धुव्वा उडवीत साखळीतील पहिल्या विजयाची नोंद केली. मध्यांतरालाच २१-०५अशी आश्वासक आघाडी घेणाऱ्या महाराष्ट्राने उत्तरार्धात देखील तोच जोश कायम राखत ३७गुणांच्या मोठ्या फरकाने हा विजय संपादन केला.
आकाश भांडे, सिद्धार्थ मुरूमकर यांच्या झंजावाती चढाया, त्याला नवाज देसाई, नौशाद शेख यांची मिळालेली पकडीची भक्कम साथ यामुळे हा विजय सोपा झाला. दुसऱ्या साखळी सामन्यात मात्र त्यांना अधिक कष्ट करावे लागले. कारण त्यांची लढत यजमान उत्तराखंड बरोबर होती.
महाराष्ट्राने ही चुरशीची लढत ४२-३५अशी जिंकत बाद फेरी गाठली. मध्यांताराला महाराष्ट्र २१-२२अशा एका गुणाने पिछाडीवर होता. पण विश्रांतीनंतर महाराष्ट्राच्या आकाश भांडे, सिद्धार्थ मुरूमकर,रोशन केशी यांनी आक्रमक चढाया करीत भराभर गुण घेतले.त्याला नवाज देसाई, नौशाद शेख यांनी धाडशी पकडी करीत मोलाची साथ देत हा विजय साकारला. यजमान उत्तराखंडने देखील उपविजयी होत बाद फेरी गाठली.
महाराष्ट्राच्या मुलींनी मात्र निराशा केली. ब गटातील पहिल्या सामन्यात महाराष्ट्राला दिल्लीकडून ४०-४७असे ७गुणांनी पराभूत व्हावे लागले. दुसऱ्या सामन्यात गोव्याने महाराष्ट्राला ३०-३१ असे चकविले. या दोन पराभवामुळे महाराष्ट्राच्या मुलींचे आव्हान साखळीतच संपुष्टात आले.
हे ही वाचा:
इतर निकाल :- किशोर गट १)ब गट हरियाणा वि. वि. झारखंड (७६-२६); २)क गट बिहार वि.वि.चंदीगड (८४-२४); ३) ड गट दिल्ली वि वि हिमाचल (४५-२७); ४)इ गट उत्तर प्रदेश वि वि गोवा (४५-३१); ५)ह गट गुजरात वि वि मणिपूर (५७-४७); ६)ब गट झारखंड वि वि केरळ (५९-४१).
किशोरी गट :- १)अ गट साई वि वि चंदीगड (५९-२१); २)ड गट तामिळनाडू वि वि गुजरात (४१-३१)  ३)इ गट मध्यप्रदेश वि वि ओडीसा (४५-४०); ४)ड गट तामीळनाडू वि वि राजस्थान (४४-३३); ५)फ गट उत्तराखंड वि वि छत्तीसगड (४५-२९); ६)क गट बिहार वि वि तेलंगणा (५५-३५).
National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
340,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा