28 C
Mumbai
Friday, October 30, 2026
घरक्राईमनामाबापाने घेतला लेकीच्या बलात्काराचा बदला! न्यायालयाच्या आवारातच घातल्‍या आरोपीला गोळ्या

बापाने घेतला लेकीच्या बलात्काराचा बदला! न्यायालयाच्या आवारातच घातल्‍या आरोपीला गोळ्या

Google News Follow

आपल्या लेकीवर झालेल्या बलात्काराचा बदला घेत एका बापाने आपल्या मुलीच्या गुन्हेगारांना यमसदनी धाडले आहे. उत्तर प्रदेशमधील गोरखपूर जिल्ह्यात ही घटना घडली असून न्यायालयाच्या आवारातच या आरोपींना गोळ्या घालण्यात आल्या. दिलशाद हुसेन असे या आरोपीचे नाव असून गोळीबारानंतर त्याचा जागीच मृत्यू झाला. तर गोळ्या चालवणाऱ्या बलात्कार पीडितेच्या वडिलांनी स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केले.

दिलशाद हुसेन हा उत्तर प्रदेशातील भोजपुर जिल्ह्याचा रहिवासी होता. सक्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या बिभीपुरा येथे तो राहत होता. तिथे त्याचे एक पंक्चरचे दुकान होते. ११ फेब्रुवारी २०२० रोजी याच भागात राहणाऱ्या एका निवृत्त सैनिकाच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्यात आले होते. मुलीच्या वडिलांनी या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली. या अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करण्यात आला होता. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करताना आरोपी दिलशाद हुसेन याला हैदराबाद येथून अटक केली होती.

हे ही वाचा:

‘आगप्रकरणातील जखमींना दाखल करण्यास नकार देणाऱ्या रूग्णालयांवर कारवाई करावी’

राजपथवर धावणार महाराष्ट्राचा चित्ररथ

डिसले यांचा शिक्षणासाठी अमेरिकेत जाण्याचा मार्ग मोकळा

फेक न्यूज पसरवणाऱ्या पाकिस्तानी वेबसाईट आणि यूट्यूब चैनल्सवर भारत सरकारची कारवाई

पॉस्को कायद्याअंतर्गत हुसेन विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गेल्या दोन वर्षापासून तो तुरुंगात होता. पण काही दिवसांपूर्वीच त्याला जामीन मंजूर झाला असून तो बाहेर आला. शुक्रवार, २१ जानेवारी रोजी या प्रकरणात गोरखपूर जिल्हा न्यायालयात सुनावणी होणार होती. या सुनावणीसाठी हुसेन न्यायालयात हजर राहण्यासाठी आला होता.

हीच संधी साधत बलात्कार पीडितेच्या वडिलांनी हुसेन वर दोन गोळ्या झाडत त्याची हत्या केली. यामध्ये एक गोळी तर त्याच्या डोक्याच्या आरपार गेली. यानंतर पीडितेच्या वडिलांनी स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केले असून आपला गुन्हा कबुल केला आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
340,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा