31 C
Mumbai
Friday, May 3, 2024
घरविशेषराजपथवर धावणार महाराष्ट्राचा चित्ररथ

राजपथवर धावणार महाराष्ट्राचा चित्ररथ

Google News Follow

Related

प्रजासत्ताक दिनी राजपथावर होणाऱ्या संचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथाला काही दिवसांपूर्वी परवानगी नाकारण्यात आली होती. मात्र, आता महाराष्ट्राच्या चित्ररथाला संचलनात सहभागी होण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. यापूर्वी केंद्र सरकारने सुरक्षेच्या कारणास्तव महाराष्ट्राच्या चित्ररथाला परवानगी नाकारली होती.

केंद्र सरकारने चित्ररथाला परवानगी दिल्यामुळे महाराष्ट्राचा चित्ररथ २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी राजपथावरील संचलनात सहभागी होणार आहे. यंदाचा चित्ररथ हा महाराष्ट्रातील जैवविविधता यावर असणार आहे. या देखाव्यातून राज्यातील जैवविविधतेचे दर्शन घडवले जाणार असून यामध्ये राज्यप्राणी, राज्यपक्षी यांसह महाराष्ट्रात आढाळणाऱ्या विविध सजीव प्रजातींचा समावेश असेल.

२६ जानेवारीला राजपथावर होणाऱ्या संचलनात राज्यांच्या संस्कृतीचे प्रतिक असणारे चित्ररथ सहभागी होत असतात. यामध्ये विविध राज्यांच्या चित्ररथांना प्रत्येकवर्षी ठराविक निकषांनुसार संधी दिली जाते. महाराष्ट्राच्या चित्ररथांनी सर्वात जास्त वेळा प्रथम क्रमांक पटकावला आहे.

हे ही वाचा:

झारखंडमध्ये दारू अखंड…घरोघरी दारूचा पुरवठा करणार

फेक न्यूज पसरवणाऱ्या पाकिस्तानी वेबसाईट आणि यूट्यूब चैनल्सवर भारत सरकारची कारवाई

‘विहंग गार्डन दंडमाफी बेकायदेशीर, घटनाविरोधी’

कमला इमारत अग्नितांडवात ७ जणांचा मृत्यू; १८ जण जखमी

२०१५ मध्ये ‘पंढरीची वारी’ या संकल्पनेवर आधारित चित्ररथ साकारला होता. तर २०१८ रोजी ‘शिवराज्याभिषेक’ या संकल्पनेवर आधारित चित्ररथ साकारला होता. या दोन्ही चित्ररथांनी प्रथम क्रमांक पटकावला होता. यापूर्वी १९८०मध्येही शिवराज्याभिषेक या विषयावरील चित्ररथाला प्रथम पुरस्कार मिळाला होता. १९८३ साली ‘बैलपोळा’ या विषयावरील चित्ररथ सर्वोत्तम ठरला होता. त्यानंतर १९९३ ते १९९५ अशी सलग तीन वर्षे अनुक्रमे गणेशोत्सव, शताब्दी, हापूस आंबे आणि बापू स्मृती या चित्ररथांना प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला होता.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा