30.4 C
Mumbai
Saturday, October 24, 2026
घरराजकारणराज्यातील नगरपरिषद निवडणूका लांबणीवर

राज्यातील नगरपरिषद निवडणूका लांबणीवर

Google News Follow

निवडणूक आयोगाकडून आज, १४ जुलै रोजी नगर परिषद निवडणुकांबद्दल मोठा निर्णय घेतला आला आहे. राज्यातील १७ जिल्ह्यातील ९२ नगरपरिषदा आणि चार नगर पंचायतीच्या निवडणूका लांबणीवर पडल्या आहेत.

ओबीसींच्या राजकीय आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यात येऊ नये, अशी मागणी सर्व राजकीय पक्षांकडून करण्यात आली होती. त्यातच ओबीसी आरक्षणावर सर्वोच्च न्यालयातही याचिकेचा निकालही प्रलंबित आहे. जोपर्यंत निकाल येत नाही तोवर निवडणूका घेऊ नयेत, अशी मागणी होत होती. निवडणुक आयोगाने ही मागणी मान्य करत निवडणुकांना स्थगिती देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

राज्यातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगांव, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, अमरावती व बुलढाणा जिल्ह्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांना स्थगिती देण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला आहे.

हे ही वाचा:

शिंदे- फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; पेट्रोल पाच रुपयांनी, डिझेल तीन रुपयांनी स्वस्त

पाकिस्तानात हिंदू मुलीचे बळजबरीने धर्मांतर करून मुस्लिम मुलाशी लग्न

असंसदीय शब्दांची यादी जाहीर; वाचा सविस्तर

अतिवृष्टीमुळे ‘या’ जिल्ह्यातील शाळांना सुट्टी

दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाने ८ जुलै रोजी पत्राद्वारे राज्यातील १७ जिल्ह्यांतील ९२ नगरपरिषदा आणि चार नगर पंचायतीच्या निवडणूका जाहीर केल्या होत्या. परंतु ओबीसी आरक्षणाचा मुद्दा सध्या न्यायालयात आहे. त्यावर १९ जुलै रोजी सुनावणी होणार आहे. त्यामुळे या निवडणुकांना स्थगिती देण्यात आली आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
340,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा