36 C
Mumbai
Tuesday, April 30, 2024
घरविशेषछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल दिसणार नव्या रुपात

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल दिसणार नव्या रुपात

मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससह नवी दिल्ली आणि अहमदाबाद रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारने मंजूर केला आहे.

Google News Follow

Related

बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत मोदी सरकारने एक महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला आहे. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससह नवी दिल्ली आणि अहमदाबाद रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारने मंजूर केला आहे. या निर्णयाची माहिती केंद्रीय माहिती व प्रसरणमंत्री अनुराग ठाकूर आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे.

रेल्वे स्थानकांच्या या पुनर्विकास प्रकल्पासाठी केंद्र सरकारने दहा हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. मुंबईतील सीएसएमटीसह नवी दिल्लीतील स्थानक आणि अहमदाबाद रेल्वे स्थानकांवर प्रवाशांच्या सुविधेसाठी किरकोळ विक्री, कॅफेटेरिया असणार आहे. तसेच मनोरंजन सुविधांसाठी ३६, ७२ तसेच १०८ मीटरचे विशाल छत असेल. या विशाल छताखाली फूड कोर्ट, प्रतीक्षालय, मुलांना खेळण्याची जागा, स्थानिक उत्पादनांच्या विक्रीसाठी जागा असणार आहे. यासोबतच रेल्वे मार्गाच्या दोन्ही बाजूंनी स्थानकाला शहराशी जोडण्यात येणार आहे. शहराच्या आत असलेल्या स्थानकांमध्ये सिटी सेंटरसारखी जागा असणार आहे.

सध्या देशात जवळपास १९९ रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाची कामे सुरू आहेत. त्यापैकी ४७ रेल्वे स्थानकांसाठी निविदा काढण्यात आल्या आहेत. तर ३२ रेल्वे स्थानकांवर काम सुरू आहे. उरलेल्या स्थानकांचे नियोजन आणि आराखड्याचे काम सुरू असल्याची माहिती अनुराग ठाकूर यांनी दिली.

हे ही वाचा:

नवरात्र २०२२ : परशुराम माता, रेणुकादेवीची कथा

कोकण विभागाकडून ११४ शेतकऱ्यांना पर्यटन प्रमाणपत्र  

डीए वाढला; सरकारची केंद्रीय कर्मचाऱ्यांना भेट

PFI बंदीवर काँग्रेसची प्रतिक्रिया; संघावर बंदी हवी!

स्थानकांवर या सुविधा असणार

  • स्थानकांना आरामदायी बनविण्यासाठी पुरेसा उजेड, मार्ग दाखविणारे संकेत, ध्वनिक्षेपण, लिफ्ट, एस्कलेटर, ट्रेव्हलटर असणार आहे.
  • पुरेशा पार्किंग सुविधांसह वाहतुकीचे सहजतेने संचालन करण्यासाठी नियोजन करण्यात येणार आहे.
  • मेट्रो, बससारख्या साधनांनी वाहतुकीचे एकीकरण करण्यात येणार आहे.
  • दिव्यांगांना अनुकूल सुविधा देण्यात येणार आहेत.
  • इंटेलिजन्स इमारतींच्या संकल्पनेवर रेल्वे स्थानकांचा विकास केला जाईल.
  • आगमन आणि प्रस्थानाचे विश्लेषण केले जाईल
  • प्रवाशांच्या सोयीसाठी पूर्ण झाकलेले उत्तम प्लॅटफॉर्म असणार आहेत.
  • प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही आणि रेल्वे स्थानकांच्या सुरक्षेसाठी ॲक्सेस नियंत्रण असणार आहे.
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा