30 C
Mumbai
Friday, April 26, 2024
घरधर्म संस्कृतीनवरात्र २०२२ : परशुराम माता, रेणुकादेवीची कथा

नवरात्र २०२२ : परशुराम माता, रेणुकादेवीची कथा

देवीचे मंदिर गिरीशिखरावर आहे. मुख्य मंदिरावर चौकोनी शिखर आहे. मंदिराचे वास्तुशिल्प प्राचीन पद्धतीचे आहे. गाभाऱ्यात रेणुकेची मूर्ती नसून तिचा मुखवटा आहे.

Google News Follow

Related

माहूर गडाची श्री रेणुका देवी ही महाराष्ट्रातील अनेक परिवारांची कुलदेवी तसेच साडेतीन शक्तिपीठांपैकी एक आहे. श्री परशुरामाची माता म्हणूनही रेणुकामातेला ओळखले जाते. देवीचे मंदिर तेराव्या शतकात देवगिरीच्या यादवकालीन राजाने बांधले असल्याचे म्हटले जाते. माहूरगडावरच श्री दत्तात्रयांचा जन्म झाला अशी भाविकांची श्रद्धा आहे.

रेणुका आणि येल्लमा माता ही एकाच देवीची नावे आहेत यामागे एक आख्यायिका प्रसिद्ध आहे. रेणुकादेवी ही प्रसेनजित राजाची कन्या. पुढे ती मोठी झाल्यावर राजाने तीचे स्वयंवर करण्याचे ठरवले. स्वयंवरात रेणुकेने जमदग्नि ऋषींना वरले आणि त्यांना वरमाला घातली, असा पुरातनात उल्लेख आहे. तर महाभारतानुसार ती कमळातून उत्पन्न झाली म्हणून तिला ‘कमली’ असेही म्हटले जाते.

रेणुका देवीची दंतकथा

दंतकथेनुसार, एकदा रेणुका गंगास्नान करत होती. तेथे चित्ररथ नावाचा गंधर्व आपल्या प्रियोत्तमेबरोबर जलक्रीडा करत होता. त्यामुळे रेणुकेचे मन विचलीत झाले आणि याची माहिती जमदग्नीनेला लागली. रेणुका आश्रमांत येताच त्याने आपल्या पाचही पुत्रांना आईचा शिरच्छेद करण्याची आज्ञा दिली. चार मुलांनी ही आज्ञा अमान्य केली. मात्र परशुरामाने प्रत्यक्ष आईला मारले. नंतर परशुरामाने आईला जीवित करण्याचा वर जमदग्नीनेकडे मागितला. जिवंत झाल्यावर रेणुका देवीने देहशुद्धीसाठी अग्निसेवन केले.

दुसरी दंतकथा अशी सांगितली जाते की, रेणुका व जमदग्नीच्या आश्रमात संपन्नता, वैभव होते. एकदा सहस्त्रार्जुन आश्रमात आला. त्याला कामधेनूच्या कृपेने असलेले आश्रमांतील वैभव खटकल्याने त्याने कामधेनूचा अपहार केला. मात्र कामधेनूने स्वत:च स्वत:चे रक्षण केले. क्रोधीत राजाने जमदग्नीचा वध केला व रेणुकेला २१ ठिकाणी २१ वेळा जखमी केले. रेणुका देवीने परशुरामाकडून एकवीस वेळा पृथ्वी निःक्षत्रिय होईल असा शाप त्याला दिला. एखाद्या पवित्र स्थानाचा शोध घेण्यासाठी परशुराम आपल्या पित्याचे शव व मातेला घेऊन तेथून निघाला. तो माहूर येथे पोहचल्यानंतर आकाशवाणी झाली आणि त्या ठिकणी त्याने वडिलांवर अंत्यसंस्कार केले. रेणुका सती जाण्यास सज्ज झाली. पण त्यापूर्वी तिने परशुरामाकडे पिण्यास पाणी मागितले. मात्र, परशुराम पाणी घेऊन येईपर्यंत रेणुकेचा अर्धाअधिक देह जळून गेला होता. मस्तक तेवढे शिल्लक राहिले होते म्हणून माहूरगडावर केवळ देवीचे मस्तक आहे. रेणुकामातेच्या वास्तव्यामुळे माहूर मातृभूमी बनली. देवी जगदंबा हिच्या स्वरुपाशी रेणुकादेवी एकजीव झालेली आहे.

रेणुका देवेची मूर्ती

देवीचे मंदिर गिरीशिखरावर आहे. मुख्य मंदिरावर चौकोनी शिखर आहे. मंदिराचे वास्तुशिल्प प्राचीन पद्धतीचे आहे. गाभाऱ्यात रेणुकेची मूर्ती नसून तिचा मुखवटा आहे. रेणुका देवीचा हा मुखवटा पाच फूट उंच व चार फूट रुंद असा आहे. गाभाऱ्याचे प्रवेशद्वार चांदीच्या पत्र्याने मढवले आहे. तिच्या महाद्वाराजवळ महाकाली ही शेंदुरचर्चित देवी आहे. शेंदुरचर्चित देवी रेणुका देवीची धाकटी बहीण असल्याचे म्हटले जाते. पूजेचा पहिला मान शेंदुरचर्चित देवीचा असतो. रेणुका देवीचे दर्शन झाल्यावर कुटलेला विडा प्रसाद म्हणून मिळतो. देवीलासुद्धा भक्त तांबूल समर्पण करतात. बैठकीवर सिंह हे देवीचे वाहन म्हणून कोरले आहे. रेणुका देवीच्या शेजारी महालक्ष्मी व तुळजाभवानी यांची दोन लहानशी मंदिरे आहेत. दक्षिणेला परशुरामाचे मंदिर आहे. महाराष्ट्राप्रमाणे कर्नाटकातही रेणुका देवीची उपासना केली जाते.

हे ही वाचा:

नवरात्र २०२२ : परशुराम माता, रेणुकादेवीची कथा

कोकण विभागाकडून ११४ शेतकऱ्यांना पर्यटन प्रमाणपत्र  

डीए वाढला; सरकारची केंद्रीय कर्मचाऱ्यांना भेट

PFI बंदीवर काँग्रेसची प्रतिक्रिया; संघावर बंदी हवी!

श्री रेणुका देवीचे मंदिर कुठे आहे?

जालना जिल्ह्यातील मंठा शहरापासून उत्तरेला अवघ्या एक किलोमीटर अंतरावर श्री रेणुका देवीचे मंदिर आहे. तसेच जिंतूर-जालना राज्य रस्त्यापासून दोन किलोमीटर अंतरावर मंदिर आहे. शहर बसस्थानकातून मंदिरात जाण्याकरिता रिक्षा उपलब्ध आहेत. उत्सव काळात येथे दिवसभर धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा