30 C
Mumbai
Wednesday, December 24, 2025
घरक्राईमनामासिरीज पाहून बँक मॅनेजरनेच केली बँकेत चोरी

सिरीज पाहून बँक मॅनेजरनेच केली बँकेत चोरी

Google News Follow

Related

डोंबिवलीमध्ये एका बँकेवर दरोडा पडल्याची बातमी समोर आली होती. आयसीआयसीआय बँकेच्या तिजोरीतून बारा कोटी रुपये लंपास करणाऱ्या टोळीच्या सूत्रधाराला पकडण्यात मानपाडा पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी इसरार कुरेशी, अहमद खान आणि अनुज गिरी या तिघांना पोलिसांनी अटक केली होती. या टोळीचा मुख्य सूत्रधार बँक कस्टोडियन अल्ताफ शेखसह त्याची बहिण निलोफरला अटक करण्यात आले आहे.

जुलै महिन्यात डोंबिवली एमआयडीसी परिसरातील आयसीआयसीआय बँकेतून बारा कोटींची चोरी झाल्याची घटना समोर आली होती. याप्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणाचा पोलीस तपास करत असताना धक्कादायक माहिती समोर आली. या बँकेत काम करणाऱ्याच मॅनेजरने ही रक्कम चोरली होती. बँकेचा मॅनेजर अल्ताफ शेख याने आपल्या काही साथीदारांसह ही रक्कम चोरली होती. या प्रकरणात पोलिसांनी इसरार कुरेशी, अहमद खान आणि अनुज गिरी या तिघांना ऑगस्टमध्ये अटक केली मात्र अल्ताफ पोलिसांना सापडत नव्हता. अटक केलेल्या तिघांकडून धक्कादायक माहिती समोर आली.

बँक मॅनेजर अल्ताफ शेख याला मनी हाईस्ट ही वेब सीरिज पाहून त्याला चोरीची कल्पना सुचली. त्याने झटपट श्रीमंत होण्याचा नादात स्वतः काम करत असलेल्या बँकेत चोरीची योजना आखली. तो कॅश कस्टोडियन मॅनेजर असल्याने त्याला बँकेविषयी सर्व माहिती होती. बँकेच्या सुरक्षा यंत्रणेमध्ये असलेली कमतरताही त्याला माहिती होती. याचाच फायदा घेत त्याने बँकेत चोरी केली.

हे ही वाचा:

भुजबळांप्रमाणे चतुर्वेदी सीए याने ‘मातोश्री’ची कागदपत्रे व्हाईट करून घेतली

सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते अरुण बाली यांचे निधन

मुंबईतल्या गोडाऊनमधून १०० कोटींचे एमडी जप्त

उत्तर प्रदेशमध्ये तरुणाने अमित बनून हिंदू मुलीवर केला बलात्कार

सुट्टीच्या दिवशी बँकेचे अलार्म निष्क्रिय करत सर्व कॅमेऱ्यांच्या हार्ड डिस्क काढून त्याने तिजोरीतून ३४ कोटी रुपये लंपास केले. हे पैसे त्याने एसीच्या डक्टमधील छिद्रातून बँकेच्या इमारतीच्या मागील बाजूस बांधलेल्या ताडपत्रीवर फेकून दिले. यानंतर बँकेतील सीसीटीव्हीचा डीव्हीआर गहाळ असल्याची माहिती बँकेच्या वरिष्ठांना देऊन तिजोरीतील रक्कम तपासणी करण्याचे पथक बँकेत बोलावले. एकीकडे तपासणी सुरू असताना दुसरीकडे त्याने आपल्या कुरेशी, अहमद खान आणि अनुज गिरी नावाच्या तीन मित्रांना बोलवून ३४ कोटींपैकी सुमारे १२ कोटी त्यांच्याकडे सोपवले. अखेर पोलिसांनी तपास करत हे संपूर्ण प्रकरण सोडवले.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
285,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा