तवांगवरून देशात राजकीय पक्षांमध्ये शब्दयुद्ध सुरू आहेत. दरम्यान, केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी सैनिकांची भेट घेतली आहे. केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी सैनिकांना भेटतानाचे छायाचित्र ट्विट केले आणि तवांग पूर्णपणे सुरक्षित असल्याचे वर्णन केले.
अरुणाचल प्रदेशातील तवांगमधील यांगत्से परिसर भारतीय लष्कराच्या पुरेशा तैनातीमुळे आता पूर्णपणे सुरक्षित असल्याचे त्यांनी म्हटले आहे. दुसरीकडे, लाइन ऑफ कंट्रोल वर चीन आणि भारतीय सैनिकांमध्ये झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी पुन्हा एकदा त्यांच्या वक्तव्यामुळे भाजपच्या निशाण्यावर आले आहेत.
कायदा मंत्री किरण रिजिजू यांनी शनिवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या चीन आणि लष्कराविषयी केलेल्या विधानाबद्दल राहुल गांधी यांना फटकारले आणि ते म्हणाले की, राहुल गांधी केवळ भारतीय सैन्याचा अपमान करत नाहीत. तर देशाची प्रतिमा देखील खराब करत आहात. असे विधान किरण रिजिजू यांनी केले भारत सरकार झोपेत असताना चीन युद्धाच्या तयारीत असल्याचा आरोप राहुल यांनी शुक्रवारी केला आणि धमकीकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला.
चीनने भारताचा २००० चौरस किलोमीटरचा भूभाग हिसकावून घेतला आहे. त्यात २० भारतीय सैनिक मारले गेले व अरुणाचल प्रदेशात आपल्या भारतीय जवानांना मारहाण करत असल्याचा आरोपही राहुल गांधी यांनी केला आहे.
हे ही वाचा:
महापुरुषांसाठी की शिंदे-फडणवीस सरकारला विरोध करण्यासाठी महामोर्चा?
उमेश कोल्हे यांच्या हत्येप्रकरणी आरोपपत्र दाखल
‘अरुणाचलच्या तवांगमध्ये धर्मांतरणाविरोधात लढणारा सैनिक म्हणजे तेची गुबीन’
रिजिजू यांनी राहुल गांधींना उद्देशून म्हणाले की, राहुल गांधी केवळ भारतीय लष्कराचा अपमान करत नाहीत, तर देशाची प्रतिमाही मलिन करत आहेत. ते काँग्रेस पक्षासाठी समस्या तर आहेतच, पण असं वक्तव्य देशासाठी अपमानकारक आहे. लोकांना भारतीय सशस्त्र दलाचा अभिमान आहे. असे विधान अरुणाचल प्रदेशचे खासदार किरण रिजिजू यांनी केले.







