33 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
घरक्राईमनामाउमेश कोल्हे यांच्या हत्येप्रकरणी आरोपपत्र दाखल

उमेश कोल्हे यांच्या हत्येप्रकरणी आरोपपत्र दाखल

नुपूर शर्मा प्रकरणामुळेच त्यांची हत्या झाल्याचे स्पष्ट

Google News Follow

Related

अमरावती येथील उमेश कोल्हे यांनी भाजपाच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांचे समर्थन करत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली होती. त्यानंतर त्यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणा तपास करत होते. याप्रकरणी एनआयएने शुक्रवारी आरोपपत्र दाखल केले आहे.

या आरोपपत्रात भाजपाच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी पैगंबरांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या समर्थनार्थ कोल्हे यांच्या सोशल मीडिया पोस्टच्या विरोधात सूड उगवण्याचे कृत्य म्हणून ही हत्या झाल्याचे आरोपात म्हटले आहे. आरोपपत्रात नाव असलेल्या ११ आरोपींमध्ये मुदस्सिर अहमद, शाहरुख खा, अब्दुल तौफीक शेख, मोहम्मद शोएब, अतिब रशीद, युसूफ खान, इरफान खान, अब्दुल अरबाझ, मुशिफिक अहमद, शेख शकील आणि शाहीम अहेमद हे आहेत.

एनआयच्या तपासात आरोपींनी हल्ला करण्यासाठी दहशतवादी टोळी तयार करून गुन्हेगारी कट रचला होता, अशी माहिती समोर आली आहे. आरोपींवर आयपीसीच्या कलम १२० बी, ३४१, ३०२, १५३-ए, २०१, ११८, ५०५, ५०६, ३४आणि बेकायदेशीर क्रियाकलाप प्रतिबंध अधिनियम १९६७ च्या कलम १६, १७,१८, १९ आणि २० अन्वये आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

हे ही वाचा:

‘अरुणाचलच्या तवांगमध्ये धर्मांतरणाविरोधात लढणारा सैनिक म्हणजे तेची गुबीन’

ठाकरेंचा घँडीवाद

नीरज चोप्राचा आणखी एक विक्रम

सीमावादामुळे चिनी वस्तूंकडे भारतीयांची पाठ

दरम्यान, नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ उमेश कोल्हे यांनी काही महिन्यांपूर्वी व्हॉट्सऍपवर पोस्ट शेअर केली होती. उमेश कोल्हे हे रात्री दुकान बंद करून घरी परतत असताना, नुपूर शर्मा यांना पाठीशी घालत असल्याच्या कारणावरून त्यांची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली होती. हल्ला झाल्यानंतर कोल्हे यांना रुग्णालयात नेण्यात आले होते पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
147,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा