32 C
Mumbai
Sunday, December 14, 2025
घरदेश दुनियासबवेमधून जाणाऱ्या गॅस टँकर अडकला आणि घर्षणातून झाला स्फोट

सबवेमधून जाणाऱ्या गॅस टँकर अडकला आणि घर्षणातून झाला स्फोट

८ लोक दगावल्याची प्राथमिक माहिती

Google News Follow

Related

दक्षिण आफ्रिकेतील बोक्सबर्ग शहरात गॅस टँकरचा भयानक स्फोट झाला आहे . या अपघातात ८ जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक जण गंभीर जखमी झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. स्फोटासोबतच गॅस टँकरने पेट घेतला. आग इतकी भीषण होती की तिच्या ज्वाळा दूरवर दिसत होत्या. या स्फोटानंतर लोक घाबरून गेल्याने घटनास्थळी चेंगराचेंगरी झाली

दक्षिण आफ्रिकेतील गोटांग प्रांतातील बोक्सबर्ग शहरातील एका अंडरपासमधून गॅसने भरलेला टँकर बाहेर पडत होता. अचानक अंडरपासमध्ये गॅस टँकर अडकला. ते काढण्याचे प्रयत्न सुरू असतानाच तेथे गॅस गळती सुरू झाली. गॅस गळतीमुळे ट्रकचे घर्षण होत असताना मोठा स्फोट झाला. अंडरपासमधील गॅस टँकरचा स्फोट झाल्याने आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट आकाशापर्यंत दिसत होते. या स्फोटात ८ पेक्षाही अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. अनेक जण जखमी झाल्याचे बोलले जात आहे.

हे ही वाचा : 

माजी सैनिकांचे टेन्शन दूर, आता मिळणार पेन्शन

पाकिस्तान विकणे आहे !

५४ वर्षांपूर्वी याच दिवशी मानव प्रथमच चंद्राच्या कक्षेत

मोदी सरकारची गरिबांना नववर्षाची भेट

स्फोटानंतर पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले आहेत. तंबो मेमोरियल हॉस्पिटलपासून काही मीटर अंतरावर हॉस्पिटल रोडवर हा स्फोट झाल्याचे सांगण्यात आले. लिक्विड पेट्रोलियम गॅसने भरलेल्या ट्रकमध्ये झालेल्या स्फोटामुळे आग आजूबाजूच्या परिसरात पसरली. सर्व आपत्कालीन सेवा संस्थांना बॉक्सबर्गमध्ये मदत करण्यासाठी तैनात करण्यात आले आहे. जखमींवर रुग्णालयात त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यातील काहींची प्रकृती गंभीर आहे, त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा