29 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
घरविशेषशिक्षणक्षेत्रासाठी राज्यसरकारने केल्या या तीन मुख्य घोषणा

शिक्षणक्षेत्रासाठी राज्यसरकारने केल्या या तीन मुख्य घोषणा

शिक्षकांसाठी आशादायक निर्णय

Google News Follow

Related

महाराष्ट्रात गुरुवारी शिक्षणक्षेत्रासाठी सरकारने ३ महत्वपूर्ण सुखद घोषणा जाहीर केल्या आहेत.त्या म्हणजे एक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या रिक्त पदांची भरती करणे, शिक्षणसेवकांच्या मानधनात वाढ करणेआणि तिसरी महत्वाची घोषणा ज्या शाळांमध्ये पटसंख्या २० पेक्षा कमी असलेल्या शाळा सुरूच ठेवणार आहेत.

शिक्षण क्षेत्रात राज्यसरकार नकारात्मक आहे,या क्षेत्राची वाटचाल खाजगीकरणाकडे जात आहे असे आरोप केले जात होते त्यात गुरुवारी झालेल्या या घोषणांमुळे एक सुखद धक्का बसला आहे आणि नवीन उमेद निर्माण झाली आहे. या क्षेत्रांत काम करण्यासाठी युवा वर्गही काहीसा सुखावला आहे.

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात शिक्षकांनी विधिमंडळासमोर निदर्शने केली होती. सरकारने तीनही प्रवर्गातील शिक्षणसेवकांच्या मानधनात सरसकट दहा हजार रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रस्तावित वाढ किमान १०० ते कमाल वाढ १६६.६७ टक्के असल्याने याला घसघशीत वाढ म्हणता येईल पण मूळ मानधनच तुटपुंजे असल्यामुळे वाढीनंतरही कुटुंबाचा भर उचलणे कठीण आहे. प्रस्तावित मानधनानंतर प्राथमिक, माध्यमिक,आणि उच्च माध्यमिक यांना अनुक्रमे १६,१८ आणि २० हजार मासिक मानधन मिळणार आहे.

हे ही वाचा:

मथुरेतील श्रीकृष्ण जन्मस्थान दाव्यावर न्यायालयाने दिले हे आदेश

जयराम गोरेंच्या वडिलांकडून घातपाताचा संशय व्यक्त

काँग्रेसच्या कार्यालयात होमहवन की तंत्रसाधना?

आयसीआयसीआय बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर यांना अटक

भावी पिढी घडवणाऱ्या मंडळींना किमान कुटुंबाच्या पोट्या पाण्याची चिंता भेडसावू नये एवढी काळजी सरकारने घ्यायलाच हवी. रिक्त पदे लवकरच भरण्याचा सरकारचा दुसरा निर्णय देखील स्वागतार्थ असला तरी, त्याची अंमलबजावणी लवकर होणे आवश्यक आहे. ज्या शाळांची पटसंख्या वीसपेक्षा कमी आहेत त्या शाळा बंद होणार अशी चर्चा होत होती मात्र असा कुठलाही निर्णय शासनाने घेतला नसल्याचा निर्णय सरकारने घेतला नाही, अशी माहिती शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी गुरुवारी विधानसभेत केली.

ही घोषणा केवळ शिक्षक म्हणून कारकीर्द घडवण्याची आकांक्षा बाळगणाऱ्या युवांसाठीच नाही तर, खेड्यापाड्यातील वास्तव्य असलेल्या पालकांसाठीही दिलासादायक आहे. पण या पार्श्वभूमीवर सर्व घोषणांची अंमलबजावणी लवकर होणे आवश्यक आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा