33 C
Mumbai
Friday, April 19, 2024
घरअर्थजगतआयसीआयसीआय बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर यांना अटक

आयसीआयसीआय बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर यांना अटक

कर्ज फसवणूक प्रकरणी सीबीआयची कारवाई

Google News Follow

Related

आयसीआयसीआय बँकेच्या माजी कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांना  सीबीआयनेअटक केली आहे. व्हिडीओकॉन ग्रुपला कर्ज देताना आयसीआयसीआय बँकेने २०१२ मध्ये केलेल्या फसवणूक आणि अनियमिततेच्या संदर्भात सीबीआयने ही कारवाई केली आहे.

कोचर यांना केंद्रीय एजन्सीच्या मुख्यालयात बोलावण्यात आले आणि थोडक्यात चौकशी केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. सीबीआयने आपल्या जबाबात टाळाटाळ करत तपासात सहकार्य करत नसल्याचा आरोप केला आहे. दोघांना शनिवारी विशेष सीबीआय न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.  आयसीआयसीआय बँकेने रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वांचे आणि बँकेच्या पत धोरणाचे उल्लंघन करून व्हिडिओकॉन समूहाच्या कंपन्यांना ३,२५० कोटी रुपयांच्या कर्ज सुविधा मंजूर केल्याचा आरोप सीबीआयने केला होता. या बदल्यात व्हिडिओकॉन ग्रुपच्या वेणुगोपाल धूत यांनी चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक यांना बेकायदेशीर लाभ दिल्याचाही आरोप आहे.

हे ही वाचा : 

भाजपा आमदार जयकुमार गोरेंच्या गाडीचा अपघात

मोदी सरकारची गरिबांना नववर्षाची भेट

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आमदाराने केली सावरकरांच्या स्मारकासाठी मागणी

क्रांतिकारक पाऊल; सौदी अरेबियात परिक्षा केंद्रात हिजाब बंदी

व्हिडिओकॉन ग्रुप आणि आयसीआयसीआय बँक या दोन्ही कंपन्यांमधील गुंतवणूकदार अरविंद गुप्ता यांनी कर्जाच्या अनियमिततेबद्दल चिंता व्यक्त केल्यानंतर २०१६ मध्ये या प्रकरणाची चौकशी सुरू झाली. गुप्ता यांनी याबाबत रिझर्व्ह बँक आणि अगदी पंतप्रधानांना पत्र लिहिले, पण त्यावेळी त्यांच्या तक्रारीची दखल घेतली गेली नाही. मार्च २०१८ मध्ये आणखी एका व्हिसल-ब्लोअरने तक्रार केली होती .

बँकिंग क्षेत्रातील पुरुषांचे वर्चस्व मोडून काढले
भारतीय बँकिंग क्षेत्रातील पुरुषांचे वर्चस्व तर मोडून काढणाऱ्या म्हणून चंदा कोचर या ओळखल्या जातात. जगभरात बँकिंग क्षेत्रातही त्यांनी एक वेगळी ओळख निर्माण केली. राजस्थानमधील जोधपूर येथील सिंधी कुटुंबात कोचर यांचा जन्म झाला . मुंबई विद्यापीठातून वाणिज्य शाखेत पदवी, इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडियामधून कॉस्ट अकाउंटन्सी आणि त्यानंतर मुंबई विद्यापीठातून व्यवस्थापनात पदव्युत्तर शिक्षण घेतले. चंदा कोचर १९८४ मध्ये आयसीआयसीआयमध्ये मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून रुजू झाल्या.१९९४ मध्ये आयसीआयसीआय संपूर्ण मालकीची बँकिंग कंपनी बनली तेव्हा चंदा कोचर सहाय्यक महाव्यवस्थापक बनवण्यात आले. यानंतर चंदा कोचर यशाच्या पायऱ्या चढत उपमहाव्यवस्थापक, महाव्यवस्थापक या पदांद्वारे त्या २००१ मध्ये कार्यकारी संचालक झाल्या . त्यानंतर त्या मुख्य आर्थिक अधिकारी आणि २००९ मध्ये चंदा कोचर यांना सीईओ आणि एमडी झाल्या. चंदा कोचर यांच्या नेतृत्वाखाली आयसीआयसीआय बँकेने किरकोळ व्यवसायात पाऊल ठेवले, ज्यामध्ये तिला प्रचंड यश मिळाले. चंदा कोचर यांना २०११ मध्ये भारत सरकारचा प्रतिष्ठेचा मानला जाणारा पद्मभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. फोर्ब्स मासिकाच्या ‘जगातील सर्वात शक्तिशाली महिला’च्या यादीत त्यांनी स्थान मिळवले होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
147,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा