26 C
Mumbai
Sunday, December 21, 2025
घरविशेषसकाळी ९ वाजता साहित्य ओसंडून वाहात असते...फडणवीसांनी कुणाला लगावला टोला?

सकाळी ९ वाजता साहित्य ओसंडून वाहात असते…फडणवीसांनी कुणाला लगावला टोला?

वर्ध्यातील साहित्य संमेलनाचा समारोप

Google News Follow

Related

वर्धा येथील ९६व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपाच्या दिवशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाषण झाले. त्यात त्यांनी विदर्भातील साहित्य विश्वाचा आढावा घेतलाच पण त्याच राजकीय टोलेबाजीही केली.

ते म्हणाले की, विदर्भ साहित्य संघाचा शताब्दी महोत्सव साजरा करत आहोत. त्यानिमित्ताने खरे म्हणजे हे संमेलन आयोजित झाले आहे. मला आनंद आहे की विदर्भ साहित्य संघाचा शताब्दी त्यानिमित्ताने हे संमेलन आयोजित झाले आहे. एकीकडे स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आपण साजरा करत आहोत,  त्याआधीपासून विदर्भ साहित्य संघ कार्यरत आहे. मराठी साहित्य परिषदही तसेच कार्य करत आहे. या संस्थांनी खऱ्या अर्थाने आमच्या साहित्य क्षेत्राचे, मराठीचे संवर्धनही केले आहे आणि अतिशय अभिमान वाटेल अशाप्रकारचे कार्य केले आहे. म्हणूनच या शताब्दी सोहळ्याच्या निमित्ताने वैदर्भिक नागरीक म्हणून या संस्थेचा अभिमान आहे.

हे ही वाचा:

दहशतवाद्यांचा हैदराबादवर हल्ला करण्याचा कट , तिघांना अटक

पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांचे निधन

तांबे आणि काँग्रेसचे पितळ

सत्यजीत तांबे यांनी नाना पटोलेंचे उघडे पाडले पितळ; चुकीचे एबी फॉर्म दिले

फडणवीसांनी सांगितले की, चांगल्या ठिकाणी हे साहित्य समेलन आयोजित केले आहे. वर्धा नदीच्या किनारी साहित्य संमेलन होत आहे. एकीकडे महात्मा गांधी आपले बापू यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अपार कष्ट घेतले. स्वातंत्र्याला दिशा दिली. किंवा भूदानाची चळवळ चालवून सामान्य माणसाला न्याय देण्याचे काम करणारे विनोबा भावे असतील यांच्या नगरीत हे संमेलन होते आहे. ज्या आंदोलनामुळे इंग्रजांना भारत सोडावा लागला त्याची ब्लू प्रिंट वर्धा ठरावात झाली ती ही भूमी आहे. म्हणून देशाला मार्ग दाखविणारी ही भूमी कदाचित जेवढी पुस्तकं लिहिली गेली तेवढी कदाचित इतर कुठल्याही नेत्याच्या संदर्भात लिहिलि गेली नसतील. त्यामुळे हे साहित्य संमेलन औचित्यपूर्ण आहे. गीताईही याच भूमित लिहिली गेली. रामराज्याचा संदेश आणि त्यासोबत खऱ्या अर्थाने शाश्वत विचाराचा संदेश या भूमीतून मिळाला आहे.

फडणवीस म्हणाले की, लोकांना प्रश्न पडतो की, साहित्य संमेलनाच्या मंचावर आमची काय आवश्यकता? पण आम्ही राजकीय लोक अनेकांची प्रेरणा आहोत. आम्ही नसलो तर व्यंगचित्रकारांना फारसे काम उरणार नाही. आमच्यातही साहित्यिक खूप आहेत. शीघ्र कवी आहेत, यमक जुळवणारे आहेत, स्क्रीप्ट लिहिणारे, स्टोऱ्या तयार करणारे लोक आहेत. तुम्ही सकाळी ९ वाजता टीव्ही लावला की आमच्यातले साहित्य ओसंडून वाहत असते, असे म्हणत फडणवीसांनी उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना एकप्रकारे टोला लगावला.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा