22 C
Mumbai
Monday, December 9, 2024
घरदेश दुनियापाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांचे निधन

पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांचे निधन

Google News Follow

Related

पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ (७९) यांचे रविवारी दुबईतील रुग्णालयात निधन झाले आहे . परवेझ मुशर्रफ यांच्या निधनाची बातमी पाकिस्तानी मीडियातून समोर आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ते रुग्णालयात उपचार घेत होते. अमायलॉयडोसिस आजाराने त्रस्त ते होते. त्यामुळे त्यांच्या शरीराच्या अवयवांनी काम करणे बंद केले होते. आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होणे शक्य नाही अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी ट्विटरवर दिली आहे.

आजारपणाच्या तक्रारीमुळे त्यांना काही आठवडे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परवेझ मुशर्रफ २०१६ पासून दुबईत राहत होते आणि गेल्या आठ वर्षांपासून त्यांच्यावर दुबईमध्ये उपचार सुरू होते. मुशर्रफ यांनी याआधी आपले उर्वरित आयुष्य पाकिस्तानात घालवण्याची इच्छा व्यक्त केली होती.

परवेझ मुशर्रफ यांचा जन्म ११ऑगस्ट १९४३ रोजी भारताची राजधानी दिल्ली येथे झाला होता. परवेझ मुशर्रफ यांना १९९८ मध्ये जनरल पदावर बढती देण्यात आली आणि त्यांनी लष्करप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. परवेझ मुशर्रफ यांनीच १९९९ मध्ये भारताविरुद्ध कारगिल युद्धाचा कट रचला होता. मुशर्रफ लष्करप्रमुख असताना त्यांनी पाकिस्तानात सत्तापालट करून मार्शल लॉही जाहीर केला होता. १९९९ मध्ये यशस्वी लष्करी बंडा केल्यानंतर परवेझ मुशर्रफ हे दक्षिण आशियाई राष्ट्राचे १० वे राष्ट्राध्यक्ष झाले.

हे ही वाचा:

पी. चिदंबरम यांच्या पत्नीची संपत्ती ईडीकडून जप्त

मध्य रेल्वे मार्गावर रविवार ५ फेब्रुवारीला मेगा ब्लॉक, जाणून घ्या वेळ…

अजितदादांच्या मते उद्धव ठाकरेंमुळे सरकार कोसळलं?

सॅमसंगचे आता भारतातच ‘स्मार्ट’ उत्पादन

नवाझ शरीफ यांना सत्तेवरून हटवण्यात आले आणि मुशर्रफपाकिस्तानचे लष्करी शासक आणि नंतर राष्ट्रपती झाले. माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांची हत्या मुशर्रफ यांच्या अध्यक्षतेदरम्यान झाली होती.मुशर्रफ यांच्यावर पीपीपीने बेनझीर यांची हत्या केल्याचा आरोप केला होता. परवेझ मुशर्रफ यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती . पाकिस्तानच्या इतिहासात पहिल्यांदाच पेशावर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश वकार अहमद सेठ यांच्या अध्यक्षतेखालील विशेष न्यायालयाच्या तीन सदस्यीय खंडपीठाने अशी शिक्षा सुनावली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
210,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा