33 C
Mumbai
Wednesday, December 17, 2025
घरबिजनेस११ राज्यांमध्ये मिळणार २०% इथेनॉल मिश्रित पेट्रोल

११ राज्यांमध्ये मिळणार २०% इथेनॉल मिश्रित पेट्रोल

२०३०पर्यंत २० % इथेनॉल मिश्रण असलेले पेट्रोल देशात सर्वत्र उपलब्ध करून देण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले

Google News Follow

Related

पेट्रोलच्या वाढत्या किमती, प्रदूषण, कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण कमी करण्याबरोबरच जनतेला स्वच्छ पर्यायी इंधन उपलब्ध करून देण्याचा केंद्र सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे. त्याचंच एक म्हणून पेट्रोलमध्ये सध्या १० टक्के एथेनॉल मिश्रण करण्यात येत आहे. दिल्लीत सुरु असलेल्या भारतीय ऊर्जा सप्ताहामध्ये मोठी घोषणा करण्यात आली. देशात जैव इंधनाला चालना देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र  मोदी यांच्या उपस्थितीत देण्यासाठी इंधन E20 म्हणजेच एथेनॉल २० मोहिमेची घोषणा करण्यात आली. त्यानुसार ११ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील ८४ किरकोळ पेट्रोल पंपांवर इ -२० इंधनाची विक्री सुरु करण्यात येणार आहे.

इथेनॉल ब्लेंडिंग प्रोग्राम अंतर्गत २०३०पर्यंत २० % इथेनॉल मिश्रण असलेले पेट्रोल देशात सर्वत्र उपलब्ध करून देण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले होते.परंतु २०२१ मध्ये सरकारने या उद्दिष्टाची मुदत पाच वर्षांनी कमी केली. आता २०२५ पर्यंत २० टक्के इथेनॉल मिश्रित पेट्रोल उपलब्ध करून देण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. ८० % पेट्रोल आणि २० % इथेनॉल मिसळले जाते तेव्हा त्याला E20 पेट्रोल म्हणतात. याचा वापर पेट्रोलप्रमाणेच इंधन म्हणूनही होऊ शकतो. देशात याआधी ५ टक्के नंतर १० टक्के आणि आता २० टक्के इथेनॉलची मिश्रण पेट्रोलमध्ये करण्यात येणार आहे.

एथेनॉल हे इको-फ्रेंडली इंधन आहे.पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळल्याने पर्यावरणाची कमी हानी होईल. इथेनॉलमध्ये पेट्रोलची गुणवत्ता दर्शवणाऱ्या ऑक्टेनचे प्रमाण जास्त असते.  म्हणूनच ते वाहने आणि पर्यावरणासाठी चांगले मानले जाते. जेव्हा पेट्रोल इथेनॉलमध्ये मिसळले जाते तेव्हा ३५ टक्के कमी कार्बन-मोनो-ऑक्साइड तयार होतो. कोणत्याही वाहनात एथेनॉल मिश्रित पेट्रोल वापरले जाऊ शकते. भारतातील बहुतांश वाहनांमध्ये बीएस ४ ते बीएस -६ स्तरापर्यंत पर्यंतची इंजिने असतात.

भारत जगातील पाचवा सर्वात मोठा इथेनॉल उत्पादक
एथेनॉल एक प्रकारचा अल्कोहोल आहे. ते बायोमासपासून बनवले जाते. बहुतेक एथेनॉल मका आणि ऊस पिकांपासून तयार केले जाते. परंतु साखर घटक असलेल्या इतर अनेक पिकांपासूनही ते तयार करता येते. भारतात अशा गोष्टींची लागवड मोठ्या प्रमाणावर होत आहे. अमेरिका, ब्राझील, युरोपियन युनियन आणि चीननंतर भारत जगातील पाचवा सर्वात मोठा इथेनॉल उत्पादक देश आहे. अशा परिस्थितीत देशात मोटारींसाठी इथेनॉल मोठ्या प्रमाणावर तयार होऊ शकते. हे एक जैव इंधन म्हणून पण ओळखले जाते.

२०२५ पर्यंत ९८८ लिटर इथेनॉलची गरज
देशातील इथेनॉलची उत्पादन क्षमता सुमारे १ हजार ३७ कोटी लिटर आहे. यामध्ये ऊसाच्या मळीवर आधारित ७०० कोटी लिटर धान्यावर आधारित एथेनॉलचा ३३७ कोटी लिटरचा समावेश आहे. २०२२-२३ वर्षात पेट्रोल-इथेनॉल इंधनाची आवश्यकता ५४२ कोटी लिटर आहे. २०२३-२४ वर्षात ती ६९८ कोटी लिटर आणि २०२४-२५ वर्षात ती ९८८ कोटी लिटर वर जाणार आहे.

शेतकऱ्यांना होणार फायदा
E20 कार्यक्रमाचा सर्वाधिक फायदा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे. अतिरिक्त उत्पन्न म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. गेल्या आठ वर्षांतील आकडेवारी पाहता इथेनॉल पुरवठादारांना त्यातून ८१ हजार ७९६ कोटी रुपये तर शेतकऱ्यांना ४९ हजार ०७८ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहेत. इतकेच नाही तर देशाची जवळपास ५३ हजार ८९४ कोटी रुपयांची बचत झाली आहे. पर्यावरण संवर्धनाचा विचार केला तर यामुळे कार्बन-डायऑक्साइड उत्सर्जन ३१८ लाख टनांनी कमी झाले आहे.

हे ही वाचा:

गल्ल्यांबद्दल कमीपणा वाटून घेण्याची गरजच नाही.

रेपो दरात वाढ.. गृहकर्जाचा हप्ता महागणार

३०,००० जखमी..६,००० इमारतींची पडझड…१.५ लाख बेघर.. ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यासाठी टाहो

श्रद्धाच्या हाडांची पावडर करून आफताबने रस्त्यांवर विखुरली

एथेनॉल पेट्रोलसाठी कंपन्या होणार सज्ज
सध्या सर्वच वाहने E20 पेट्रोल सक्षम नाहीत. क्रेटा, व्हेन्यू , अल्काझर एसयूव्ही सारख्या गाड्या E20 पेट्रोलवर चालण्यास सक्षम असल्याचे म्हटल्या जाते . नुकत्याच झालेल्या ऑटोएक्सपोमध्ये टाटा मोटर्सने त्यांची दोन नवीन टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिने सादर केली. परंतु इंजिन निर्मात्यांना आधीच E20 पेट्रोलसाठी इंजिन बनवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आता अन्य कंपन्या देखील इ २० पेट्रोलसाठी लवकरच सज्ज होतील यात शंका नाही.

वापर वाढेल तशा पेट्रोलच्या किमती होतील कमी
सध्या पेट्रोलमध्ये फक्त १० % इथेनॉल मिसळले जाते. या पेट्रोलवर ५२ टक्के कर आहे. अशा परिस्थितीत पूर्वीच्या पेट्रोलच्या तुलनेत E20 पेट्रोलची किंमत थोडी कमी होईल. परंतु इथेनॉलची प्रमाण जसे वाढत जाईल तशी पेट्रोलची किंमत कमी होईल असे जाणकारांचे मत आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा