26 C
Mumbai
Sunday, March 26, 2023
घरक्राईमनामामंत्रालयातील अधिकाऱ्याच्या मुलीशी अश्लिल चाळे करणाऱ्या पोलिसांनी केले जेरबंद

मंत्रालयातील अधिकाऱ्याच्या मुलीशी अश्लिल चाळे करणाऱ्या पोलिसांनी केले जेरबंद

पत्ता विचारण्याच्या बहाण्याने करत होता छेडछाड

Google News Follow

Related

मंत्रालयातील एका उच्चस्तरीय अधिकाऱ्याच्या मुलीसमोर अश्लिल चाळे करणाऱ्याला ताडदेव पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे. या आरोपीचे नाव अब्दुल अहमद घौस मोहम्मद राहिनी असे आहे. ही घटना सोमवारी ६ फेब्रुवारीला ताडदेवला रेसकोर्सजवळ असलेल्या गव्हर्नमेंट कॉलनीजवळ घडली.

गाडीत बसलेल्या सदर आरोपीने पत्ता विचारण्याच्या बहाण्याने मंत्रालयातील त्या अधिकाऱ्याच्या २२ वर्षीय मुलीला जवळ बोलावले. ती मुलगी जवळ जाताच त्याने स्वतःच्या गुप्तांगाशी चाळे करायला सुरुवात केली. त्या मुलीने ते आपल्या मोबाईल फोनच्या सहाय्याने शूट केले. तेव्हा त्या चालकाने त्या मुलीशी लगट करत तिच्याशी शरीरसंबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. पण मुलीने आरडाओरडा केला. तेव्हा तो चालक पळून गेला.

हे ही वाचा:

शिवरायांचा अमेरिकेतील एकमेव पुतळा चोरीला

पोलिसांना वाटले धमकीचा कॉल, पण लक्षात आले तेव्हा डोक्यावर हात मारून घेतला

नाणार होणार, ठाकरे गटाचे काय जाणार?

पंतप्रधानांचे पुनर्वापर केलेल्या प्लॅस्टिकपासून बनलेले जॅकेट

मुलीने काढलेल्या व्हिडिओच्या मदतीने पोलिसांनी या आरोपीच्या मुसक्या आवळल्या. अब्दुल अहमद गौस मोहंमद रहिनी हा २३ वर्षांचा असून अंधेरी येथून त्याला अटक करण्यात आली आहे. आरोपी कार सर्व्हिस सेंटर मध्ये काम करत आहे. त्याला गिरगाव दंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले. पोलिसांना त्या मुलीने काढलेला व्हीडिओ दाखविण्यात आले. यावरून पोलिसांनी त्या चालकाला ताबडतोब अटक केली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,880चाहतेआवड दर्शवा
2,035अनुयायीअनुकरण करा
65,400सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा