24 C
Mumbai
Friday, December 19, 2025
घरदेश दुनियावॉल स्ट्रीट जर्नल म्हणते की, भाजप जगातील सर्वात महत्त्वाचा राजकीय पक्ष

वॉल स्ट्रीट जर्नल म्हणते की, भाजप जगातील सर्वात महत्त्वाचा राजकीय पक्ष

२०२४ च्या निवडणुकांबरोबरच भाजपावरील लेख सुद्धा प्रसिद्ध

Google News Follow

Related

भारतीय जनता पक्ष हा जगातील सर्वात महत्वाचा असा राजकीय पक्ष असल्याचे आणि सर्वात कमी समजण्यात आलेला असा हा पक्ष असल्याचे मत वॉल्टर रसेल मिड यांनी वॉल स्ट्रीट जर्नल मध्ये व्यक्त केले आहे. भारताचा सत्ताधारी पक्ष अमेरिकेच्या हितसंबंधाच्या दृष्टिकोनातून जगातला सर्वात महत्वाचा राजकीय पक्ष असल्याचे त्यांनी आपल्या लेखामध्ये लिहिले आहे. त्यांना कमी लेखणे चुकीचे आहे. २०१४ आणि २०१९ अशा लागोपाठच्या यशानंतर आता २०२४ मध्ये भाजप विजयाची  हॅट्ट्रिक साधणार असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.

पुढील काही काळामध्ये भाजप पक्ष आपले वर्चस्व प्रस्थापित करेल. भारताच्या मदतीशिवाय चीनची वाढती ताकद ओळखून रोखण्याचे अमेरिकेचे प्रयत्न यशस्वी होणार नाहीत. भाजप पक्षाला कमी लेखल जाते कारण बहुतांश,  याबाहेरील लोकांना ते अपरिचित आहेत. भाजपच्या निवडणुकांमध्ये हिंदू अजेन्डा स्पष्ट असून पाश्चात्य उदारमतवाद्यांच्या बऱ्याच कल्पना भाजपाने नाकारल्याचे दिसत आहे. चिनी कम्युनिस्ट पक्षाप्रमाणे भाजपच्या एक अब्जाहून जास्त लोकसंख्या असलेल्या त्यांच्या देशाचे नेतृत्व करून ते महासत्ता बनू इच्छितात.

हे ही वाचा:

फक्त नेते एकत्र येऊन भाजपाला कसे काय हरवणार… प्रशांत किशोर यांनी विचारला प्रश्न

संबित पात्रा म्हणाले की, राहुल गांधी म्हणजे मीर जाफर!

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांना मातृशोक

नेरुळ येथे बांधकाम व्यावसायिकाला गोळ्या घालणारे सापडले बिहारमध्ये

भाजपाने मुस्लिम बांधवांच्या पाश्चात्य उदारमतवादाच्या अनेक कल्पना आणि प्राधान्यक्रम नाकारले आहेत. इस्त्रायल मधल्या लिकुड पक्षाप्रमाणे भाजपाकडे लोकवादी नेतृत्व आणि पारंपारिक मूल्यांसह मूलगामी बाजार समर्थक आर्थिक भूमिका आहेत. तर ते अशा लोकांच्या संतापालाही वाट करून देतात ज्यांचा महानगरीय, पाश्चात्य केंद्रित सांस्कृतिक आणि राजकीय उच्चभ्रूनि बहिष्कार आणि तिरस्कार केला आहे. त्यांच्या लेखात त्यांनी पुढे म्हंटले आहे कि, अमेरिकन विश्लेषक डाव्या उदारमतवादी विचारसरणीचे बरेचदा नरेंद्र मोदींबरोबरच भारत देशाकडे बघतात. आणि ते डेन्मार्क सारखे का नाही असा विचारतात. त्यांची चिंता पूर्णपणे चुकीची नाही. यावर सत्ताधारी आघाडीवर टीका करणाऱ्या पत्रकारांना छळवणुकीला सामोरे जावे लागू शकते.

मिड पुढे असेही लिहितात, बऱ्याच लोकांना आर एस एस किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या शक्तीची भीती वाटते ज्याचा भाजपच्या नेतृत्वाशी जवळचा संबंध आहे. पण , भारताच्या ईशान्येकडील काही राज्यामध्ये भाजपाला गेल्या काही वर्षात उल्लेखनीय राजकीय यश मिळाले आहे. शेवटी ते म्हणतात, भाजप आणि आरएसएस च्या वरिष्ठ नेत्यांसोबतच त्यांच्या काही समीक्षकांसोबतच्या सखोल बैठकीनंतर मला खात्री आहे की, अमेरिकन आणि इतर पाश्चिमात्य जनतेला शक्तिशाली चळवळीमध्ये अधिक सखोलपणे सहभागी होण्याची गरज आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा