34 C
Mumbai
Saturday, June 3, 2023
घरराजकारणसंबित पात्रा म्हणाले की, राहुल गांधी म्हणजे मीर जाफर!

संबित पात्रा म्हणाले की, राहुल गांधी म्हणजे मीर जाफर!

राहुल गांधी यांना माफी मागावीच लागेल आणि आम्ही त्यांना माफी मागायला लावू

Google News Follow

Related

काँग्रेसचे खासदार आणि नेते राहुल गांधी सध्या चर्चेत आहेत ते केंब्रिजमधील त्यांच्या भाषणामुळे. त्यासंदर्भात त्यांनी माफी मागावी अशी मागणी भारतीय जनता पार्टीकडून केली जात आहे. त्यावर भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ता संबित पात्रा यांनी म्हटले की, राहुल गांधी हे मीर जाफर आहेत. नवाब बनण्यासाठी जे मीर जाफरने केले तेच राहुल गांधी करत आहेत.

पात्रा यांनी पत्रकार परिषदेत म्हटले की, ब्रिटन आणि अमेरिकेकडून राहुल गांधी यांनी मदत मागितली आहे. हे एक कारस्थान आहे. मीर जाफरने नवाब बनण्यासाठी असेच केले होते आणि लंडनमध्ये बसून राहुल गांधी यांनीही हेच केले. ते शहजादा नवाब बनू इच्छितात. पण आजच्या या मीर जाफरना माफी मागावी लागेल. शहजाद्यांचे ही कृती खपवून घेतली जाणार नाही.

हे ही वाचा:

संजय राऊतयांनी आता डोक्यालाच गुंडाळले!

वींद्र वायकरसुद्धा ठाकरेंना सोडून चालले का?

इंटरपोलच्या रेड कॉर्नर नोटिशीच्या यादीतून मेहुल चोक्सी गायब!

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रेमात चिनी फॉलोअर्स

राहुल गांधी यांनी माफी मागावी यासंदर्भात पात्रा म्हणाले की, राहुल गांधी माफी मागितल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही. माफी मागितल्याशिवाय त्यांना निसटता येणार नाही. माफी तर आम्ही त्यांच्याकडून मागूनच राहणार. राफेल प्रकरणातही त्यांना माफी मागावी लागली होती. त्यामुळे संसदेच्या सभागृहातही त्यांना माफी मागावी लागेल. राहुल गांधी यांनी भारतातील लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी ब्रिटन आणि अमेरिकेकडे मदत मागितली होती. हेच काम मणिशंकर अय्यरही करत आहात. दोघेही भारताची बदनामी करत आहेत. पात्रा यांनी सांगितले की, राहुल गांधी यांनी संसदेत जे प्रश्न आतापर्यंत उपस्थित केले ते सर्वात कमी आहेत. पण तरीही ते म्हणतात की, मला बोलू दिले जात नाही. राहुल गांधींकडे एक टेपरेकॉर्डर आहे तो ते देशभर वापरत असतात.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,851चाहतेआवड दर्शवा
2,022अनुयायीअनुकरण करा
76,300सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा