23 C
Mumbai
Monday, December 22, 2025
घरविशेषचार वर्षांत ४ कोटी भारतीयांना मधुमेहाची लागण!

चार वर्षांत ४ कोटी भारतीयांना मधुमेहाची लागण!

यूके मेडिकल जर्नल 'लॅन्सेट'मध्ये प्रकाशित झालेल्या आयसीएमआरच्या अहवालातील आकडेवारी

Google News Follow

Related

इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च म्हणजेच ICMR च्या अहवालातून मधुमेहाच्या रुग्णांबद्दल धक्कदायक आकडेवारी समोर आली आहे. भारतात आताच्या घडीला १० कोटींहून अधिक मधुमेहाचे रुग्ण आहेत. २०१९ मध्ये ही आकडेवारी ७ कोटी इतकी होती. विशेष म्हणजे केवळ चार वर्षांत ४ कोटी भारतीयांना मधुमेहाची लागण झाल्याची धक्कादायक बाब या अहवालातून समोर आली आहे. आयसीएमआरने ही आकडेवारी ब्रिटनच्या लॅन्सेट या प्रतिष्ठित वैद्यकीय जर्नलमध्ये प्रकाशित केली आहे.

गोवा, केरळ आणि पुदुच्चेरी या राज्यांमध्ये मधुमेहाचे प्रमाण सर्वाधिक आहे. उत्तर प्रदेशमध्ये दर एका मधुमेह रुग्णामागे चार प्री- डायबेटिक केसेस आहेत, अशी माहिती अहवालात आहे. साडेतेरा कोटी नागरिक हे प्री- डायबेटिक आहेत. म्हणजेच, त्यातील एक तृतीयांश लोकांना कधीही मधुमेह होऊ शकतो. लठ्ठपणा, संथ जीवनशैली आणि कुटुंबात मधुमेहाचा इतिहास असणं ही डायबेटीसची तीन प्रमुख कारणे आहेत.

यूके मेडिकल जर्नल ‘लॅन्सेट’मध्ये प्रकाशित झालेल्या आयसीएमआरच्या अहवालानुसार, भारतात मधुमेहाच्या रुग्णांची संख्या १०.१ कोटींहून अधिक आहेत. २०१९ मध्ये, ही संख्या ७ कोटी इतकी होती. रुग्णसंख्येची वाढती टक्केवारी पाहिली तर ही वाढ ४४ टक्के इतकी आहे.

गोवा, पुदुच्चेरी आणि केरळ या राज्यांमध्ये मधुमेहाचा अनुक्रमे २६.४ टक्के, २६.३ टक्के आणि २५.५ टक्के सर्वाधिक प्रसार दिसून आला. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार आणि अरुणाचल प्रदेश यांसारख्या कमी प्रसार असलेल्या राज्यांमध्ये पुढील काही वर्षांत मधुमेहाच्या रुग्णांमध्ये वाढ होण्याची शक्यता असल्याचे आयसीएमआरच्या अहवालातून स्पष्ट झालं आहे.

हे ही वाचा:

तुमचाही दाभोलकर होणार; शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी

लोकसभा निवडणुकीआधी एनडीएचे बळ वाढणार

मृतदेहाचे तुकडे कुकरमध्ये का शिजवले? आरोपी मनोजने सांगितले कारण

अमेरिकेतील सभांमध्ये राहुल गांधींच्याभोवती जिहादीं गटांचे कोंडाळे

‘गोवा, केरळ, तामिळनाडू आणि चंदीगडमध्ये मधुमेहाच्या रुग्णांपेक्षा कमी प्री- डायबिटीज रुग्ण आहेत. पुद्दुचेरी आणि दिल्लीमध्ये, ते जवळजवळ समान आहेत आणि म्हणून आपण असं म्हणू शकतो की, तेथील रुग्णांची संख्या स्थिर होत आहे, परंतु मधुमेहाची कमी प्रकरणे असलेल्या राज्यांमध्ये, शास्त्रज्ञांनी प्री-डायबेटिक असलेल्या लोकांची संख्या जास्त नोंदवली आहे,’ अशी माहिती मद्रास डायबेटिक रिसर्च फाऊंडेशनचे अध्यक्ष आणि अभ्यासाचे पहिले लेखक डॉ. रणजित मोहन अंजना यांनी दिली आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
285,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा