29.6 C
Mumbai
Saturday, October 24, 2026
घरक्राईमनामाभूमाफिया लेडी डॉन करीना शेखसह तिघांवर गुन्हा

भूमाफिया लेडी डॉन करीना शेखसह तिघांवर गुन्हा

माजी नगरसेवकाला जीवे मारण्याची धमकी

Google News Follow

माजी नगरसेवक आणि शिवसेना नेते परमेश्वर कदम यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी पंतनगर पोलिसांनी शुक्रवारी घाटकोपरची गॉडमदर आणि लेडी डॉन म्हणून कुप्रसिद्ध असणाऱ्या करीना शेख उर्फ आपा हिच्यासह तिच्या दोन साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घाटकोपरमधील कामराज नगर, विक्रोळीतील कन्नमवार नगर आणि नेताजी नगर या झोपडपट्टी भागात भूमाफियांची मोठी दहशत असून त्यापैकी एक करीना शेख या लेडी डॉनचे नाव सर्वात पुढे आहे. बेकायदेशीर बांधकाम बांधकामांना विरोध करणारे स्थानिक माजी नगरसेवक परमेश्वर कदम यांच्यासोबत भूमाफियाचा वाद सुरू आहे.

 

करीना शेखच्या सांगण्यावरून मनपाने ४ जुलै रोजी हे बेकायदा बांधकाम पाडण्यात आले होते. हे बेकायदा बांधकाम करीना शेखचा सहकारी अक्रम अन्सारी याचे होते असे माजी नगरसेवक परमेश्वर कदम यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. अन्सारी हा शेख यांच्याकडून विविध प्रकारच्या धमक्या देण्यासाठी तो माझ्या कार्यालयात येत आहे, करीना शेख कोणत्याही दिवशी माझ्या कार्यालयात बुरख्यात येऊन मला गोळ्या घालू शकते, आणि माझे काय झाले हे कोणालाही कळू देणार नाही अशी धमकी अन्सारीने दिल्याचे परमेश्वर कदम यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

हे ही वाचा:

भारत-चीन यांच्यात कॉर्प्स कमांडर स्तरावर बैठक!

दादर मध्ये साखळी बॉम्ब स्फोटाची धमकी

आयफेल टॉवर बॉम्बने उडवण्याची धमकी

२२ महिला पोलीस अधिकार्‍यांसह १४० पोलिसांना ‘केंद्रीय गृहमंत्री पदक’ जाहीर

४ जुलै रोजी कदम यांनी कामराज नगरमध्ये आणखी काही बेकायदेशीरपणे बांधलेल्या इमारतींबाबत तक्रार केलेल्या होत्या, ही बेकायदेशीर बांधकामे पालिकेने पाडले, त्यानंतर अन्सारीने फोन करून थेट जीवे मारण्याची धमकी दिल्याचे कदम यांनी तक्रारीत म्हटले आहे. “तक्रारदाराने दिलेला जबाब आणि कॉल रेकॉर्डच्या आधारे, आम्ही करीना शेख, अन्सारी आणि त्यांचा आणखी एक साथीदार राधाकृष्ण हरिजन यांच्यावर गुन्हेगारी कट आणि गुन्हेगारी धमकी देण्याच्या आरोपा खाली गुन्हा दाखल केला आहे,” असे पंत नगर पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.

घाटकोपरची गॉडमदर कोण?

करीमा शेख उर्फ आपा जी पूर्वी करीमा मुजी शाह म्हणून ओळखले जात होती, तिच्यावर खून, खंडणी आणि अवैध शस्त्रास्त्रेचा व्यापार करणे या प्रकारचे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. “घाटकोपरची गॉडमदर” म्हणून ओळखल्या जाणार्‍या, करीनाला तिच्या टोळीतील गुंड आपा, मम्मी या नावाने संबोधतात.

 

 

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, त्रासलेल्या,घरातून पळून गेलेल्या मुलांचा करीना शेख सांभाळ करते. ही मुले तिच्या इशाऱ्यावरून चोरी, दरोडे आणि चेन स्नॅचिंग सारखे गुन्हे करायचे. पोलिसांनी सांगितले की करीना शेख ही राहण्यास असलेल्या घाटकोपर पूर्वेकडील कामराज नगर झोपडपट्टी पट्ट्यात बेकायदेशीर घरे बांधण्यास सुरुवात केली. ही घरे भाड्याने देऊन त्यातून येणाऱ्या पैशातून तिचा उदरनिर्वाह चालत होता. पुढे हीच संपत्ती विकून तीने भरपूर पैसा कमावला. २०२० मध्ये मुंबई पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने तिला शेवटची अटक केली होती त्यानंतर ती जामिनावर बाहेर पडली आणि वर्सोवात राहण्या आली.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
339,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा